द कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या भरगोस यशानंतर विवेक अग्निहोत्री व्हॅक्सीन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. येत्या २८ सप्टेंबर २०२३ रोजी व्हॅक्सीन वॉर चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटात पल्लवी जोशी, अनुपम खेर, नाना पाटेकर, गिरीजा ओक, रायमा सेन, रणदीप आर्य यासारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने …
Read More »सचिन पिळगावकर बनले उर्दूचे ब्रँड अँबॅसिडर.. बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी गिरवले होते धडे
बालकलाकार, गायक ते चित्रपट दिग्दर्शक अशा विविध भूमिकेतून सचिन पिळगावकर यांनी आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. नुकतेच सचिन पिळगावकर यांना मोहसीन-ए- उर्दू हा पुरस्कार देण्यात आला आहे. एक अस्सल महाराष्ट्रीयन ज्याची मातृभाषा मराठी आहे. त्या सचिन पिळगावकर यांनी उर्दूवरील प्रेमाखातर शहरातील सामाजिक सांस्कृतिक संस्था उर्दू मरकझचा मोहसिन-ए-उर्दू म्हणजेच उर्दूचा …
Read More »बाप्पा कायम माझ्या पाठीशी आहे.. माझे नैराश्येचे दिवस होते त्या रात्री साडे बारा वाजता मी
होममिनिस्टर या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर भाऊजी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. देवावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे आणि म्हणून बाप्पा आपल्याला आलेल्या संकटातून बाहेर काढतो. तो माझ्या पाठीशी आहे, अशी त्यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिली आहे. काही वर्षांपूर्वी आदेश बांदेकर यांनी दुधीचा रस प्यायला होता. यामुळे त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. ते जगतील …
Read More »कुठली अभिनेत्री तयार व्हायला सर्वात जास्त वेळ लावते.. अशोक मामांनी दिलं भन्नाट उत्तर
झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले चिमुरडे गायक आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या शोमध्ये जयेश खरे सह गौरी शेलार, देवांश भाटे, आदित्य फडतरे, सौरोजय देव यांच्या गायकीचे मोठे कौतुक केलेले पाहायला मिळते. गाण्याचे कुठलेही क्लासेस न लावलेले जयेश …
Read More »आडनावामुळे लोक फक्त तुम्हाला ओळखतात.. स्टार किड्स असण्यावर आदिनाथचा खुलासा
महेश कोठारे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा आदीनाथ कोठारे अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रात दाखल झाला. पण एक स्टार कीड म्हणून तुम्हाला जरी या सृष्टीत ओळखलं जात असलं तरी इथे तुम्हाला स्ट्रगल करावाच लागतो. असे मत आदीनाथ कोठारेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले आहे. तुम्ही कोण आहात यापेक्षा तुमच्या …
Read More »मुखवट्यामागचे खरे चेहरे कळल्यावर, हेच का ते असा प्रश्न पडतो.. मराठी कलाकारांना घर मिळवून देण्यासाठी मी
महेश टिळेकर हे गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. मराठी तारका या त्यांच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या सृष्टीत काम करत असताना महेश टिळेकर यांनी कलाकारांची बाजू जाणून घेण्याचे प्रयत्न नेहमीच केले. अशातच त्यांना कमी किंमतीत घरं मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र यातून त्यांना …
Read More »प्रसिद्ध अभिनेत्रीला पुत्ररत्न प्राप्ती.. मराठी सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव
मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत ही बातमी जाहीर केली आहे. ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे राधा सागर. राधा सागर ही मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री आहे. आई कुठे काय करते, सुंदरा मनामध्ये भरली अशा मालिकांमधून राधाने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. …
Read More »अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण
मराठी सृष्टीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून अविनाश आणि ऐश्वर्या नारकर ह्यांच्याकडे पाहिले जाते. ऐश्वर्या नारकर यांचे लग्नाअगोदरचे नाव पल्लवी. दोघांची पहिली भेट एका नाटकानिमित्त झाली होती. त्यानंतर ऐश्वर्या नारकर यांनीच पुढाकार घेऊन अविनाश नारकर यांना प्रपोज केले होते. एकत्र कुटुंब पद्धतीत त्यांचा संसार सुखाचा चालला आहे. या प्रवासात दोघेही आपल्या फिटनेसकडे …
Read More »जमलं तर त्या वाघनखांनी.. महाराजांची वाघनखं भारतात आणण्यावर नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनने महाराजांची वाघनखं परत देणार असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. सामंजस्य करार करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार १ ऑक्टोबर रोजी लंडनला जाणार आहेत. मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, आम्हाला ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पत्र मिळाले. त्यामध्ये …
Read More »पायरीवर बसून जवान पाहणारा मराठमोळा अभिनेता ट्रोल.. सुभेदारवर एवढं प्रेम दाखवलं असतं तर
शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. नयनतारा, विजय सेथुपती, प्रियमनी, योगी बाबू अशा दाक्षिणात्य कलाकारांसह अभिनेत्री गिरीजा ओक देखील या चित्रपटात महत्वाचा भाग बनले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थीएटर बाहेर गर्दी करत आहेत. नुकताच हा चित्रपट पाहण्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याने हजेरी लावली होती. …
Read More »