कलाकारांची मुलं आता एका पर्यायी मार्गाची करिअर म्हणून निवड करू लागले आहेत. मराठी सृष्टीत हे बदल घडून येत आहेत त्यामुळे त्यांचे नक्कीच कौतुक केले जात आहे. भरत जाधव यांची मुलगी डॉक्टर आहे. तर शरद पोंक्षे यांच्या मुलीने पायलट प्रशिक्षक म्हणून पदवी मिळवली आहे. तर अलका कुबल यांची मुलगी देखील पायलट आहे. अशोक सराफ यांचा मुलगा अभिनय क्षेत्रात न येता शिक्षक म्हणून लंडनमध्ये नुकताच रुजू झाला आहे. याच जोडीला अभिनेता संतोष जुवेकर याची लाडकी परी आता डॉक्टर झाली आहे.
संतोष जुवेकर याने त्याच्या पुतणीसाठी ही एक कौतुकाची थाप देणारी पोस्ट शेअर केली आहे. संतोष जुवेकर याने मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्याने स्वतःच्या बळावर या इंडस्ट्रीत जागा बनवली आहे. संतोष जुवेकर हा घटस्फोटित आहे, खूप वर्षांपूर्वी संतोषने इंडस्ट्रीबाहेरील एका तरुणीसोबत लग्न केले होते पण काही वर्षांतच त्यांच्यात घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येते. पण असे असले तरी संतोष त्याच्या पुतणीला त्याच्या लेकिपेक्षाही खूप काही मानतो. मधुरा जुवेकर ही संतोषची पुतणी आहे. मधुरा ही माझ्या पोटचा गोळा नाही पण माझ्या जीवाचा तुकडा आहे आणि तीच माझं सर्वस्व आहे असे तो तिच्याबद्दल सांगत असतो.
हीच मधुरा आता डॉक्टर झाल्याने संतोषला त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आज संतोषने त्याच्या लाडक्या परीचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी कळवली आहे. त्यावर सेलिब्रिटींनीही अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. ही खास पोस्ट शेअर करताना संतोष जुवेकर म्हणतो की, पिल्लू तू माझ्या पोटचा गोळा नसलास तरी माझ्या जीवाचा तुकडा आहेस आणि तूच आता माझं सर्व काही आहेस पिल्या. पिल्लू खूप मोठ्ठा हो आणि खूप मस्त आयुष्य जग तुझ्या आयुष्यात तू काहीही कर आणि कुठल्याही क्षेत्रात जा पण एक उत्तम आणि चांगल्या मनाचा आणि विचारांचा माणूस हो ते जास्त महत्वाच. बाकी तेरा च्याचा तेरे साथ कायम असणार, डरने घबरनेका नाय अजिबात.