माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठीवरील मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेच्या कलाकारांनी मात्र प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनवली होती. त्याचमुळे या मालिकेचा पार्ट २ प्रेक्षकांच्या भेटीला यावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल या मालिकेतील अभिनेत्याने मोठ्या थाटात साखरपुडा करून आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेता निखिल राजेशिर्के याने याने परिच्या बाबांची भूमिका साकारली होती.

अविनाश हे पात्र विरोधी असल्याने प्रेक्षकांच्या रोषाला त्याला सामोरे जावे लागले होते. निखिलने आजवर अशाच धाटणीच्या भूमिका साकारलेल्या पाहायला मिळतात. पण असे असले तरी हीच त्याच्या सजग अभिनयाची पावती मानली जाते. अजूनही बरसात आहे, तुला शिकवीन चांगलाच धडा, रंग माझा वेगळा अशा मालिकेत निखिलने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काल गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मराठी सृष्टीतील कलाकारांनी आयुष्याला नवीन सुरुवात करत साखरपुडा केल्याची बातमी शेअर केली आहे. त्यात अभिनेत्री शिवानी सोनार तसेच सारं काही तिच्यासाठी मालिका फेम अभिषेक गावकर यांनीही साखरपुडा केला असल्याचे जाहीर केले आहे.

शिवानी सोनार हिने सिंधुताई माझी माई या मालिकेतून एक्झिट घेतली आणि अभिनेता अंबर गणपुळे सोबत साखरपुडा केला. तर या एकाच दिवशी अभिषेक गावकर याने त्याची गर्लफ्रेंड सोनाली सोबत मोठ्या थाटात साखरपुडा केलेला पाहायला मिळाला. त्यामुळे मराठी सृष्टीत या एकाच दिवशी साखरपुड्याच्या सोहळ्याला हजेरी लावताना कलाकारांची धावपळ सुरू होती. रेश्मा शिंदे हिने अभिनेता निखिल राजेशिर्के याच्या साखरपुड्याला हजेरी लावून त्याला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. तर अभिषेक गावकरच्या साखरपुड्याला सारं काही तिच्यासाठी मालिकेच्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
Hey people!!!!!
Good mood and good luck to everyone!!!!!