देशभरात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्वच मोठ्या पक्षातील नेतेमंडळींची प्रचारासाठी धावपळ सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता गोविंदा मुंबईतून निवडणूक लढणार असे बोलले जात होते. पण काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करत त्यांनी स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी स्वीकारली असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान मराठी सृष्टीतही काही कलाकार निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्यात अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर त्यांचेही नाव घेण्यात येते.
मुंबईतील उत्तर पश्चिम भागातून सचिन पिळगावकर हे लोकसभेची निवडणूक लढणार असे बोलले जात आहे. पण या चर्चेवर आता स्वतःच सचिन पिळगावकर यांनी मौन सोडलं आहे. ही वातमी खरी नाही या अफवेवर विश्वास ठेवू नका, असे म्हणताना सचिन पिळगावकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या चर्चेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे की मी लोकसभा निवडणुकीत उतरतोय ही अफवाह माझ्या कानावर ही आली. मी हसलो, एवढच सांगू शकतो की मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्तं आहे माझ्या प्रेक्षकांचा. ६१ वर्ष आपला,
सचिन पिळगांवकर. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा कडून अनेक सेलिब्रिटींना राजकारणाच्या मंचावर उतरवलं आहे.
काही दिवसांपूर्वी कंगना राणावत हिला तिकीट मिळाल्याचे जाहीर करण्यात आले होते. तर काँग्रेस पक्षाने स्वरा भास्करला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अनेक सक्रिय राजकीय नेत्यांना डच्चू देत मोठमोठ्या पक्षांनी ही संधी आता सेलिब्रिटींना देऊ केली आहे. त्यामुळे मराठी सृष्टीतून सचिन पिळगावकर यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. सचिन पिळगावकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही एक अफवा आहे आणि या अफवेवर विश्वास ठेवू नका. मी कुठल्याही पक्षाचा नाही असे त्यांनी जाहीरपणे म्हटले आहे.