झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेत आता नायक नायिकेच्या लग्नाची बोलणी चालू झाली आहेत. अभिराम जहागीरदार हा अंतराच्या प्रेमात असतो पण आज तिची इच्छा म्हणून तो पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करायला तयार होतो. लीला ही ऑडिशन समजून वधूपरीक्षा देते. पण आता अभिराम स्वतःच लीला सोबत लग्न करायला तयार होतो. स्टॅम्प पेपरवर पैसा प्रॉपर्टी जे काही हवं ते लिही अशी एक त्याने लीलाला ऑफरच देऊ केली आहे. यावर आता लीलाचा निर्णय काय असणार हे लवकरच कळेल.
पण तूर्तास या मालिकेत आणखी एक ट्विस्ट आलेला आहे. लीलाची बहीण रेवतीचे विक्रांतवर प्रेम असते. तशी विक्रांतवर असलेल्या प्रेमाची तिने कबुली दिली आहे. पण रेवतीचा बॉयफ्रेंड विवाहित आहे हे लीलाला समजणार आहे. लीला मार्केटमध्ये असताना तिला तिथे विक्रांत दिसतो. पण विक्रांतसोबत आणखी एक तरुणी असते. त्यामुळे विक्रांतचे लग्न झालेले आहे याचा तिला उलगडा होणार आहे. मालिकेत विक्रांतचे पूजा सोबत लग्न झालेले असते पण तरीही तो रेवतीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो. मालिकेत पूजाची भूमिका अभिनेत्री संध्या माणिक हिने साकारली आहे. पूजाच्या मदतीने लीला विक्रातचा डाव उधळून लावणार हे आता स्पष्ट झालेले आहे. संध्या माणिक हिने याअगोदर बऱ्याच मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत ती माधुरीच्या विरोधी भूमिकेत झळकली होती. खेड तालुक्यातील वेताळे हे संध्याचे गाव. पण मुंबईतच तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. वकिलीची पदवी घेतल्यानंतर संध्या अभिनयाच्या ओढीने ऑडिशन देऊ लागली. दिल दोस्ती दुनियादारी, गुरू, देवमाणूस अशा मालिकेतून, चित्रपटातून तिने काम केले आहे. आता पुन्हा एकदा नवरी मिळे हिटलरला मालिकेतून ती झी मराठीवर झळकणार आहे. अर्थात तिने साकारलेली पूजाची भूमिका छोटीशी जरी असली तरी विक्रांतचा डाव उधळून लावण्यासाठी लीलाला तिची मोठी मदत होणार आहे. त्यामुळे पूजाचे पात्र देखील तेवढेच महत्वाचे असणार आहे. आता पूजा विक्रांतची साथ देणार की लीलाची मदत करणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. दरम्यान या नवीन मलिकेसाठी आणि नवीन भुमिकेसाठी संध्या माणिक हिला शुभेच्छा.