Breaking News
Home / मराठी तडका / नवरी मिळे हिटलरला मालिकेतील लीला आहे खूपच खास.. खऱ्या आयुष्याबद्दल जाणून कराल कौतुक​
vallari londhe
vallari londhe

नवरी मिळे हिटलरला मालिकेतील लीला आहे खूपच खास.. खऱ्या आयुष्याबद्दल जाणून कराल कौतुक​

झी मराठीवर कालपासून एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवरी मिळे हिटलरला या मालिकेची अवखळ आणि बिनधास्त नायिका लीला प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. ही भूमिका अभिनेत्री वल्लरी विराज हिने तिच्या अभिनयाने सुंदर वठवलेली पाहायला मिळत आहे. वल्लरी विराज ही गेली अनेक वर्षे मराठी, हिंदी मालिकेतून काम करते आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कन्नी या चित्रपटात तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. वल्लरीबद्दल आणखी जाणून तुम्हाला तिचं नक्कीच  कौतुक करावसं वाटेल.

vallari londhe shalibirds
vallari londhe shalibirds

कारण आजवर अनेक प्राणी पक्ष्यांना तिने आसरा दिलेला आहे. लहान मुलांसाठी जसे पाळणाघर असतात तशाच पद्धतीने प्राण्यांसाठी शहराच्या ठिकाणी पाळणाघर चालवली जातात. अशीच एक गरज ओळखून मराठमोळी अभिनेत्री आपले प्राणिप्रेम जपत आहे. वल्लरी विराज लोंढे असे तिचे पूर्ण नाव आहे. वल्लरीने या अगोदर सोनी टीव्हीवरील अहिल्याबाई होळकर या हिंदी मालिकेत पार्वतीची भूमिका साकारली होती. कॉलेजमध्ये असल्यापासूनच वल्लरीने नाटकात काम केले होते. नृत्याचीही तिला विशेष आवड आहे. २०१९ साली श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेची ती विजेती ठरली होती. वल्लरीचे वडील विराज लोंढे हे मराठी चित्रपट निर्माते म्हणून ओळखले जातात.

vallari londhe social work
vallari londhe social work

नागराज मंजुळे यांच्या नाळ चित्रपटाची त्यांनी निर्माता म्हणून काम केले आहे. श्रावण क्वीन ठरलेल्या वल्लरीने हळूहळू अभिनय क्षेत्रात देखील आपला जम बसवलेला पाहायला मिळतो. मात्र यासोबतच ती प्राणीप्रेम देखील जपताना दिसत आहे. वल्लरीची आई वैशाली लोंढे या शालीबर्ड्स नावाने पाळणाघर चालवतात. फक्त पाळीव प्राण्यांसाठीच नाही तर अगदी गरुड, बगळे, सरडे यांसारखे दुखापत झालेले प्राणी, पक्षी त्यांच्याकडे आश्रयाला येतात. जखमी झालेले प्राणी, पक्षी त्या आपल्या पाळणाघरात आणतात. त्यांची व्यवस्थित काळजी घेऊन औषधोपचार करतात. जेव्हा हे पक्षी पुन्हा ठणठणीत बरे होतात तेव्हा खुल्या आकाशात त्यांना सोडून देण्यात येते. वल्लरीचे बालपण देखील याच प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या सहवासात गेले आहे.

त्यामुळे केवळ कुत्रा आणि मांजरच नाही तर अगदी बगळे, गरुड, सरडे यांचा तिला आता छान लळा लागला आहे. असे बरेचसे पाळीव प्राणी, पक्षी त्यांच्या पाळणाघरात आश्रयाला येतात. यानिमित्ताने वल्लरीने एक खास व्यवसाय देखील सुरू केलेला आहे. कुत्र्यांसाठी तिने बाथ अँड बार्क्स नावाने सलून देखील सुरू केले आहे. त्यांच्या पाळणाघराला नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री म्हणून वल्लरी सोशल मीडियावर सतत सक्रिय असली तरी तिची ही दुसरी बाजू देखील आता तिच्या चाहत्यांना आवडणार आहे. तिचा हा प्रवास जाणून अनेकजण तिचं कौतुकही करत आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.