बॉलिवूड सृष्टीतील बऱ्याचशा अभिनेत्रींनी लिप फिलरच अनुभव घेतला आहे. पण या लिप फिलर मुळे सौंदर्यात भर पडण्याऐवजी कॅमेऱ्यापासून त्यांना दूर पळावे लागले आहे. श्रीदेवीने तिच्या अखेरच्या दिवसात लिप फिलर करून घेतले होते. पण बेढब ओठांमुळे तिला बाहेर कुठेही जाताना चेहरा लपवावा लागला होता. अनुष्का शर्मा, राखी सावंत, मौनी रॉय या सेलिब्रिटींच्या बाबतीतही असेच काहीसे घडलेले पाहायला मिळाले होते. पण आता असाच एक अनुभव मराठी सृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांच्या सुनेने घेतला आहे. मराठी सृष्टीत लिप फिलरला अजून कोणी ट्राय केलेले नाही.
आधुनिक तंत्रज्ञानाने सौंदर्यात भर घालण्यापेक्षा त्याचे नुकसानच जास्त आहे. म्हणून तसे अनुभव मराठी अभिनेत्रींनी घेण्याचे टाळले आहेत. उमा भेंडे यांची सून ही देखील मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. श्वेता महाडिक हे त्यांच्या सुनेचे नाव आहे. आज उमा भेंडे हयात नसल्या तरी मुलगा प्रसाद भेंडे हा सिनेमॅटोग्राफर म्हणून इंडस्ट्रीत कार्यरत आहे. तर श्वेताने सुबोध भावे सोबत लोकमान्य चित्रपटात काम केले होते. पण मुलाच्या जन्मानंतर श्वेताने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. त्याअगोदर ती हिंदी मालिका सृष्टीतही नाव लौकीक करताना दिसली होती. सध्या ती सोशल मीडियावर क्राफ्टिंग, ड्रेस डिझायनिंगच्या आयडियाज शेअर करत असते. त्यामुळे तिच्या फॅन फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झालेली आहे. नुकतेच श्वेताने लिप फिलर केल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
लिप फिलर करायचंय हे तिने अगोदरच जाहीर केले होते. त्यानंतर श्वेताचा लिप फिलर पाहून तिच्या चेहऱ्यात झालेला बदल चाहत्यांना मात्र संभ्रमात टाकणारा ठरला आहे. तू अगोदरच खूप छान दिसत होतीस, लिप फिलरची काय गरज अशी नकारात्मक प्रतिक्रिया तिला देण्यात येऊ लागली आहे. लिप फिलरमुळे श्वेता चांगली दिसत नाही. तिच्या चेहऱ्यात बदल झाल्यामुळे तिने असं करायला नको होतं, ही प्रतिक्रिया तिला मिळू लागली आहे. पण लिप फिलर हे काही महिन्यांपूरतेच टिकून राहते त्यानंतर तुमचे ओठ पूर्ववत होतात हे माहीत असल्याने श्वेताने हे धाडस केले आहे. दरम्यान लिप फिलरमुळे ती ट्रोल होत असली तरी आयुष्यात एक असाही अनुभव घ्यावा म्हणून तिने हा प्रयत्न केला आहे. पण चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहून तिचा हा प्रयत्न पुरता फसला की काय असेच चित्र आता दिसत आहे.