एखाद्या मालिकेचे भाग वाढवायचे असतील तर त्याच्या कथानकात ट्विस्ट आणले जातात. या गोष्टी आता प्रेक्षकांनाही चांगल्याच ठाऊक झाल्या आहेत. हे ट्विस्ट अँड टर्न्स काही काळापुरते प्रेक्षक स्वीकारतातही पण जेव्हा वर्षानुवर्षे मालिका तग धरून राहतात. तेव्हा मात्र प्रेक्षकांचा नाईलाज होतो आणि मालिकेवर टीका करू लागतात. पूर्वीच्या काळी ७ च्या पटीत मालिका वाढवली जायची. पण अति पाणी ओतून ती आमटी पांचट करण्यापेक्षा वेळीच थांबने गरजेचे असते हे त्याकाळातल्या मालिका दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी ओळखले होते.
राजदत्त यांच्या सारखा दिग्दर्शक जेव्हा गोट्या मालिका करतो तेव्हा एक मर्यादा असावी म्हणून वाहिनीने मालिका वाढवायची म्हणून केलेला आग्रह त्यांना मुळीच मान्य नव्हता. त्याचमुळे पूर्वीच्या मालिकांसारखी एक ट्रिक वापरण्यात यावी अशी विचारसरणी पुढे येऊ लागली आहे. आता याच बाजूला बघायचं झालं तर गेल्या काही दिवसांपूर्वी आई कुठे काय करते या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांना अपचनी पडला. आता अशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरणे कितीपत योग्य आहे असे ट्रोलर्सने त्यावर म्हटले होते. मालिका वाढवण्यापेक्षा बंद करा अशी मागणी या मालिकेच्या बाबतीत करण्यात आली. मालिकेच्या लेखिका नमिता वर्तक यांनाही प्रचंड ट्रोल करण्यात आले. हीच बाजू ओळखून प्रसिद्ध लेखिकेने तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिलेली पाहायला मिळत आहे.
रोहिणी निनावे या प्रसिद्ध लेखिका आहेत तसेच त्या गीतकार देखील आहेत. अनेक मालिकेच्या शीर्षक गीतांचे लेखन त्यांनी केलेले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालेल्या साधी माणसं आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची शीर्षक गीतं त्यांनी लिहिली आहेत. घरकुल, भाग्यिवधाता, अवंतिका, ऊन पाऊस, माझ्या नवऱ्याची बायको अशा अनेक मलिकेसाठी त्यांनी लेखन केले आहे. त्यामुळे मालिका लिहीत असताना त्याला किती मेहनत घ्यावी लागते हे त्यांनाच माहीत असते अशी त्या एक यातून ट्रोलर्सना प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपट, नाटक आणि मालिका बनवताना किती लोकांचे किती कष्ट लागले असतात हे फेसबुकवरच्या ट्रोलर्सना कळणं शक्य नाही! अशी एक इंस्टा पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. त्यांच्या या मतावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालिका चित्रपट प्रेक्षकांच्या समोर आणणं आणि त्या इतकी वर्षे चालवणं ह्या सहजसोप्या गोष्टी मुळीच नाहीयेत. त्यामागे अपार कष्ट घ्यावे लागतात हे ट्रोलर्सना कसं कळणार असं मत त्यांनी इथे दिलं आहे.