महाराष्ट्राची हायजत्रा फेम चेतना भट हिने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. टाटा पंच ही जवळपास ८ ते ९ लाखांची गाडी खरेदी करत आज तिने तीचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. चेतना भट ही महाराष्ट्राची हायजत्रा शो चा अविभाज्य भाग बनली आहे. भुवया उडवून बोलणे, प्राण्यांची नक्कल करणे या गोष्टींमुळे ती हास्यजत्रेमध्ये लोकप्रिय बनली आहे. विनोदी अभिनयाच्या जोडीला चेतना उत्तम गाते देखील. गीतकार मंदार चोळकर सोबत ती विवाहबद्ध झाली होती. ही अनोखी गाठ, लग्न कल्लोळ अशा चित्रपटासाठी मंदारने गाणी लिहिली आहेत.
मंदार चोळकर आणि चेतना भट या दोघांची लव्हस्टोरी देखील खूपच इंटरेस्टिंग म्हणावी लागेल. २०१५ मध्ये तुझ्याविन मर जावा यासाठी मंदारने गाणी लीहिली होती. चेतनाने यात काम केलं होतं. या म्युजिक लॉन्च सोहळ्यात चेतना देखील उपस्थित होती. तेव्हा चेतनाने मंदारला तुझ्या कविता मला आवडतात असे येऊन म्हटले होते. मुलींना गाणी आवडतात इथपर्यंत ठीक होतं. पण माझ्या कविता आवडणारी ही मुलगी आहे तरी कोण म्हणून मंदारने चेतनाला त्याचदिवशी फेसबुकवर शोधून काढलं होतं. तेव्हा चेतना अभिनेत्री आहे हे त्याला समजलं. त्यानंतर दोघेही एकमेकांना फोनवर बोलू लागले, भेटी वाढत गेल्या.
तसे त्यांच्यात प्रेम जुळत गेले. चेतना प्रामाणिक आहे ती खोटं कधीच बोलत नाही आणि मी त्याच्या अगदी विरुद्ध आहे. मी खोटारडा आहे असं नाही पण मला कधी कधी या इंडस्ट्रीत काही कामासाठी खोटं बोलावं लागतं. त्यामुळे मला चेतनाचा स्वभाव आवडू लागला असे मंदार चेतनावर असलेल्या प्रेमाबद्दल सांगतो. त्यानंतर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्न केलं. दरम्यान छोट्या छोट्या भूमिकेतून पुढे आलेल्या चेतनाने महाराष्ट्राची हास्यजत्रामधून चांगला जम बसवलेला पाहायला मिळाला. आणि म्हणूनच या यशाचे एक पाऊल पुढे टाकत आज तिने गाडी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. तिच्या या स्वप्न पूर्तीबद्दल कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.