मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच पूजा सावंतच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. अशातच आता स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने शाही थाटात लगमगाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिने सिद्धार्थ राऊत सोबत मोठ्या थाटात लग्न केले. डेस्टिनेशन वेडिंग असल्याने तिच्या लग्नाचा थाट पाहण्यासारखा होता. लग्नात स्वरदाने लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती तर सिध्दार्थने सफेद रंगाचा शेरवानी परिधान केला होता.
स्वरदा आणि सिध्दार्थचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर दोन महिन्यातच त्यांनी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळत आहे. लग्नागोदर स्वरदाने तिच्या माहेरी देवक पूजन केले होते. त्यावरून ती लग्न करतीये अशी बातमी व्हायरल झाली होती. साखरपुड्यावेळी मराठी सृष्टीतील काही मोजक्या कलाकारांना तिने आमंत्रण दिले होते. स्वरदाने ज्याच्याशी आयुष्यभराची लग्न गाठ बांधली तो सिद्धार्थ राऊत आर्किटेक्ट आहे. पुण्यातील क्रिओस डिझायनर येथे तो आर्किटेक्टचे काम करतो. स्वरदाने माझे मन तुझे झाले या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने शुभ्राची भूमिका गाजवली होती. हरीश दुधाडे सोबत तिने या मालिकेतून एकत्रित काम केले होते.
मराठी मालिकेतून प्रमुख भूमिका साकारल्यानंतर स्वरदा हिंदी मालिकेकडे वळली होती. सावित्रीदेवी कॉलेज अँड हॉस्पिटल, नागीण, प्यार के पापड अशा हिंदी मालिकेत तिला महत्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. थोडं तुझं थोडं माझं या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली होती. हिंदी मालिकेनंतर स्वरदा पुन्हा मराठी मालिकेकडे वळली. स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. स्वरदा अभिनेत्री असण्यासोबतच योगा ट्रेनर देखील आहे. स्वरदा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्वरदा आणि सिध्दार्थच्या लग्नानिमित्त चाहत्यांकडून अभिनंदन केले जात आहे.