Breaking News
Home / जरा हटके / मुग्धा वैशंपायणच्या घरी लगीनघाई.. ग्रहमख पूजन आणि हळदीचा थाट पाहिलात का
mrudul vaishampayan mugdha vaishampayan
mrudul vaishampayan mugdha vaishampayan

मुग्धा वैशंपायणच्या घरी लगीनघाई.. ग्रहमख पूजन आणि हळदीचा थाट पाहिलात का

गायिका मुग्धा वैशंपायण हिने गेल्याच महिन्यात प्रथमेश लघाटे सोबत साखरपुडा केला होता. या दोघांनी मोजक्याच नातेवाईकांच्या समवेत कुठलाही गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा केला होता. मुग्धाच्या घरी यंदा दोन कार्ये पार पडणार हे अगोदरच जाहीर करण्यात आले होते. मुग्धाची ताई मृदुल वैशंपायण हिचेही यावर्षी लग्न पार पडणार असे म्हटले होते. त्यानुसार वैशंपायण कुटुंबात सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे. मुग्धाचे केळवण पार पडले त्यावेळी तिच्या ताईचेही लग्न जुळले होते.

mugdha vaishampayan prathamesh laghate
mugdha vaishampayan prathamesh laghate

दोघी बहिणींची लग्न एकाच मांडवात होणार का? असा त्यांच्या चाहत्यांना पडला होता. पण आता ताईचे लग्न म्हणत मुग्धाने घरात लगीनघाई सुरू झाली असल्याचे म्हटले आहे. मुग्धा आणि मृदुल या दोघी बहिणी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. मुग्धाच्या युट्युब चॅनलवर मृदुलला देखील पाहण्यात आले आहे. या दोघी बहिणी अनेकदा एकत्र धमाल करताना दिसतात. दोघींचे गातानाचे व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे मुग्धासोबत अनेकांजण मृदुलचे देखील चाहते झाले आहेत. काहीच दिवसांपूर्वी मुग्धाचे बाबा त्यांच्या कामातून सेवानिवृत्त झाले. नागोठणे येथे रिलायन्स इंडस्ट्रीत त्यांनी ३३ वर्ष नोकरी केली होती. सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर वैशंपायण कुटुंबात आता लग्नसोहळ्याची लगबग सुरू झाली आहे.

prathamesh laghate mugdha vaishampayan
prathamesh laghate mugdha vaishampayan

मृदुल ही मुग्धाची थोरली बहीण आहे. दोन दिवसांपासून वैशंपायण कुटुंबात मृदुलच्या लग्नाची लगबग सुरू झालेली आहे. ताईच्या मेहेंदीच्या सोहळ्याचे काही खास व्हिडीओ मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काल ग्रहमख पूजन वेळी मृदुलने नेसलेल्या लाल काळ्या रंगाच्या साडीत तिचे रूप अधिकच खुलून दिसत होते. त्यानंतर हळदीच्या सोहळ्यात दोघी बहिणींनी खूप धमाल केलेली पाहायला मिळाली. प्रथमेश आणि मुग्धा दोघेही मृदुलच्या लग्नासाठी तयारी करताना दिसले. आज मृदुलचा विवाहसोहळा पार पडत आहे. त्यासाठी मृदुलचे अभिनंदन करण्यात येत आहे. पण यासोबतच प्रथमेश आणि मुग्धा दोघे लग्नाच्या बेडीत कधी अडकतायेत अशीही त्यांना विचारणा केली जात आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.