Breaking News
Home / बॉलिवूड / बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन अंत्यावस्थेत.. सचिन पिळगावकरला भेटण्याची शेवटची इच्छा केली व्यक्त
jr mehmood sachin pilgaonkar
jr mehmood sachin pilgaonkar

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन अंत्यावस्थेत.. सचिन पिळगावकरला भेटण्याची शेवटची इच्छा केली व्यक्त

बॉलिवूड सृष्टीत अनेक कलाकार घडले त्यातलेच एक म्हणजे ज्युनिअर महमूद. ज्युनियर मेहमूद हे बालवयातच विनोदी भूमिकांमुळे प्रसिद्धीस आले होते. त्यांच्या अडखळत बोलण्याच्या हटके स्टाइलमुळे त्यांनी ७० चे दशक गाजवले होते. पण त्यांचे खरे नाव हे नईम सय्यद असे होते, ज्युनियर हे महमूद यांच्यामुळेच त्यांना हे नाव देण्यात आले होते. ज्युनियर महमूद सध्या अंत्यावस्थेत आहेत. कॅन्सरचे निदान झाल्याने त्यांच्याकडे आता अवघे ४० दिवसच राहिले आहेत असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

sachin pilgaonkar junior mehmood
sachin pilgaonkar junior mehmood

ज्युनिअर मेहमूद हे गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होते. अचानक वजन कमी होत होते त्यामुळे सततचे हे दुखणे पाहून त्यांनी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांना पोटाचा कॅन्सर झाल्याचे सांगितले. हा कॅन्सर चौथ्या स्टेजला असल्याने त्यांची प्रकृती खूपच खालावत चालली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ज्युनिअर मेहमूद यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील अत्यंत नाजूक आहे, अशातच त्यांना कावीळ देखील झाली होती. आपल्या मित्राची झालेली ही अवस्था पाहून जॉनी लिव्हर यांनी नुकतीच ज्युनिअर मेहमूदची भेट घेतली. ज्युनिअर मेहमूद यांचे जवळचे मित्र सलाम काझी हे गेली १५ वर्षे एकत्र आहेत. त्यांनीच मीडियाला आपल्या मित्राच्या खालावलेल्या तब्येतीबाबत माहिती दिली होती.

sachin pilgaonkar family
sachin pilgaonkar family

यावेळी मेहमूद यांनी आपली शेवटची ईच्छा व्यक्त करताना म्हटले की मला सचिन पिळगावकर आणि जितेंद्र यांना भेटायचं आहे. मित्राची ही शेवटची ईच्छा कळताच सचिन पिळगावकर यांनी कालच मेहमूद यांची भेट घेतली. आणि त्यांच्या मुलांना काही आर्थिक स्वरूपाची मदत देखील देऊ केली पण मेहमूद यांच्या मुलांनी ती मदत नाकारली. आणि त्यांच्यासाठी फक्त प्रार्थना करा अशी विनंती केली. तर जितेंद्र यांनी देखील ज्युनिअर मेहमूदची शेवटची ईच्छा पूर्ण केलेली आहे.सचिन पिळगावकर आणि ज्युनियर महमूद यांनी बॉलिवूड सृष्टीत एकत्रित काम केले होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांची मैत्री जुळली होती. गीत गाता चल, बचपन, ब्रह्मचारी यांसारख्या चित्रपटातून दोघांनी काम केले होते. महत्वाचं म्हणजे ज्युनिअर मेहमूद यांनी मराठी सृष्टीत दिग्दर्शक म्हणूनही आपले नशीब आजमावले होते.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.