रविवारी रात्री इंडियन आयडॉल या रिऍलिटी शोच्या १४ व्या सिजनचा महाअंतिम सोहळा पार पडला. यावेळी वैभव गुप्ता या स्पर्धकाने विजयाच्या ट्रॉफीवर शिक्कामोर्तब केला. कानपुरच्या वैभवने ट्रॉफीसह, २५ लाखांचा धनादेश आणि मारुती सुझुकी ब्रेझा अशी बक्षिसं जिंकली. अंजना पद्मनाभन, अनन्या पाल, पियुष पनवार, सुभादीप दास आणि आद्य मिश्रा हे स्पर्धक या शोच्या महाअंतिम सोहळ्यात सहभागी झाले होते. सुभादीप दास फर्स्ट रनरअप ठरल्यानंतर त्याला ५ लाखांचे बक्षीस देण्यात आले. सेकंड रनरअप ठरलेल्या पियुष पनवारला देखील ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले. तर थर्ड रनरअप ठरलेल्या अनन्या पाल हिला ३ लाखांचं बक्षीस देण्यात आलं.
इंडियन आयडॉलचा हा निकाल देखील नेहमीप्रमाणे अनपेक्षितच लागलेला पाहायला मिळाली. कारण या सिजनमध्ये सुरुवातीपासूनच सुभादीपने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. गेल्या कित्येक दिवसांच्या मेहनतीनंतर सुभादीप विजेता होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांनी व्यक्त केली होती. मात्र अंतिम निकाल समोर येताच आणि विजेता वैभव गुप्ता ठरल्याचे नाव जाहीर होताच प्रेक्षकांनी यावर तीव्र नाराजी जाहीर केलेली पाहायला मिळाली. वैभव गुप्ता हा गेल्या दोन आठवड्यापासून फॉर्म मध्ये आलेला पाहायला मिळाला. त्याचमुळे प्रेक्षकांनी त्याच्या बाजूने निकाल जाहीर केला असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. पण रिऍलिटी शोमध्ये अनेकदा असे अनपेक्षित निकाल लागलेले आहेत. जो विजयाचा खरा दावेदार असतो त्या स्पर्धकाला मुद्दामहून रिऍलिटी शोमध्ये डावलण्यात येतं हेच यावरून दिसून येत आहे.
मराठी हिंदी असे कोणतेही रिऍलिटी शो असो. अशा शोमध्ये नेहमी अनपेक्षित निकाल समोर आलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षक आता त्यांची नाराजी व्यक्त करू लागले आहेत. वैभव गुप्ता हा देखील उत्तम गायक आहे पण सुभादीप त्याच्यासमोर कायम सरस राहिला आहे. वैभवने याअगोदर सारेगमप लिटिल चॅम्पस्, व्हॉइस ऑफ कानपूर या रिऍलिटी शोमध्ये सहभाग दर्शवला होता. व्हॉइस ऑफ कानपूरचे विजेतेपद पटकावल्यामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्याचमुळे कानपूरच्या चाहत्यांनी त्याला पुन्हा एकदा जिंकवून दिले आहे असेच आता या निकालावरून दिसून येत आहे. शेवटी प्रेक्षकांनी दिलेल्या वोटिंगमुळे तो निवडून आला असे म्हणत प्रेक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.