Breaking News
Home / जरा हटके / बाबांच्या आठवणीत फुलवा खामकर झाली भावुक.. मला आठवणारे बाबा दारूच्या आहारी गेले..
phulawa khamkar parents
phulawa khamkar parents

बाबांच्या आठवणीत फुलवा खामकर झाली भावुक.. मला आठवणारे बाबा दारूच्या आहारी गेले..

प्रसिद्ध नृत्यांगना आणि कोरिओग्राफर फुलवा खामकर ही लेखक पत्रकार अनिल बर्वे यांची मुलगी आहे. तर तिचा भाऊ राही बर्वे हा लेखक तसेच चित्रपट दिग्दर्शक आहे. राहिने तुंबाड या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनिल बर्वे यांनी साप्ताहिक माणूस मध्ये रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता ही नक्षलवादी चळवळीचा आढावा देणारी लेखमाला लिहिली होती. ७० च्या दशकात ही लेखमाला खूप गाजली होती. नक्षलवादी पत्रके छापली म्हणून त्यांना दीड वर्षे तुरुंगात डांबले होते. डोंगर म्हतारा झाला, होरपळ अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या होत्या.

phulawa khamkar anil barve
phulawa khamkar anil barve

६ डिसेंबर १९८४ रोजी अनिल बर्वे यांचे निधन झाले होते. फुलवा त्यावेळी खूप लहान होती. बाबांच्या आठवणी सांगताना भावुक होऊन ती म्हणते की, बाबा आज तुम्हाला जाऊन ३९ वर्ष झाली. मी पाचवी मधे होते. सकाळपासून खूप धडधडत होतं. आई हॉस्पिटल मधून आली आणि तिने सांगितलं, बाबा गेले. मला फक्त आजोबांचा आक्रोश आठवतोय.आजी आणि आई खूप शांत होत्या! दारूमुळे माणूस इतका असहाय्य होऊ शकतो? एक अत्यंत प्रतिभावान, हुशार आणि जगाच्या पुढे असणारा माणूस दारूमुळे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी जातो हे भयानक आहे! मग बाबा हा कप्पा मी पूर्णपणे बंद करुन ठेवला! मात्र तुमच्या लिखाणामुळे आजच्या पिढीला सुद्धा लेखक अनिल बर्वे माहीत आहे याचा खूप आनंद आम्हाला होतो.

choreographer phulwa khamkar
choreographer phulwa khamkar

अनिल बर्वेची आम्ही मुलं आहोत हा अभिमान सुद्धा आम्हाला आहे! ज्यूलिएटचे डोळे,रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता, कोलंबस वाट चुकला, अकरा कोटी गॅलन पाणी, थँक यू मिस्टर ग्लाड, हमीदा बाईची कोठी. स्टड फार्म, डोंगर म्हातारा झाला. पुत्र कामेष्टी, मी स्वामी या देहाचा, आकाश पेलताना, किती किती वेगळं आणि काळाच्या पुढचं लिखाण होतं तुमचं बाबा! तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे त्तुम्ही चालवलेलं एक फिल्मी मासिक, ज्याचं नाव होतं फुलवा. नेहमीप्रमाणेते सगळं व्यवस्थित बुडलं, कुण्या एका मित्राने तुम्हाला सांगितलं की फुलवा हे नाव लाभदायक नव्हे. झालं भविष्य, देव, धर्म यावर विश्वास नसलेल्या तुम्हाला याचा राग आला.

तुम्ही म्हणालात मला जर मुलगी झाली तर तिचं नाव मी फुलावाच ठेवणार, ती नाव काढेल! हा किस्सा मला हल्लीच समजला आणि आम्ही खूप हसलो. आणीबाणीच्या काळात तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या गुप्त पोलिसाला त्याला उगाच त्रास नको म्हणून तुम्ही बरोबरच घेऊन फिरत होता. बाबा तुम्ही सामान्य माणूस या कक्षेत बसणारे नव्हता. पण एक मुलगी म्हणून मात्र माझ्याकडे तुमच्या खूप वेगळ्या आणि काहीशा कटू आठवणी आहेत. कारण मला आठवणारे बाबा दारूच्या खूप आहारी गेले होते. इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती. आम्ही खूप लहान होतो! मी ९ वर्षांची,राही ४ आणि आमच्या हातात काहीच नव्हत! असहाय्य होतो आम्ही. बाबा, इतकी वर्ष तुमच्याबद्दल मनात एक किंतू होता पण आता तो नाहीये!

कदाचित आता तुमच्याकडे एक माणूस म्हणून सुद्धा मी पाहू शकतेय इतका समजूतदारपणा वयामुळे माझ्यात आला असावा. आज मला खरच खूप वाटतय की तुमच्या दोन्ही मुलांचं पुढे काय झालं हे पहायला तुम्ही हवे होतात. आज तुमच्या मुलीचं नाव फुलवा ठेवल्याचा तुम्हाला आनंद झाला असता. आणि राहीला पाहून, त्याचं काम पाहून त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही नाचला असतात. तुमच्या लिखाणाचा वारसा त्याने घेतला आहे. आज तुम्हाला आमचा अभिमान वाटावा असं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय बाबा! तुमची फुलवा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.