बाईपण भारी देवा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन दोन आठवडे होत आहेत मात्र तरीही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. गुजराथमधील अनेक मराठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची इच्छा होती त्यासाठी तीस चाळीस किलोमीटर अंतर पार करून ही मंडळी थिएटरमध्ये आली होती. …
Read More »अबोली मालिकेतील चिमुरडा आहे प्रसिद्ध कलाकाराचा मुलगा
स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत काही दिवसांपूर्वीच अबोली आणि अंकुशच्या लव्ह स्टोरीमध्ये पल्लवीची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. अंकुश त्याची स्मृती गमावतो यात मालिकेने एक वर्षांचा लीप घेतलेला असतो. अंकुशची स्मृती परत येण्यासाठी अबोली प्रयत्न करत आहे. या मालिकेत सचित राजे आणि पल्लवीच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या चिमुरड्याबद्दल काही खास गोष्टी जाणून …
Read More »महेश कोठारे यांना मातृशोक.. मातोश्री सरोज देखील होत्या अभिनेत्री
महेश कोठारे यांची आई “जेनमा उर्फ सरोज अंबर कोठारे” यांचे १५ जुलै २०२३ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. जेनमा कोठारे या ९३ वर्षांच्या होत्या. महेश कोठारे यांना मातृशोक झाल्याने त्यांचे कुटुंबीय सध्या दुखाच्या छायेखाली वावरत आहे. ह्याच वर्षी म्हणजे २१ जानेवारी रोजी महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे निधन …
Read More »लाजिरवाणी गोष्ट.. रविंद्र महाजनी यांना अखेरचा निरोप देताना केवळ हाच कलाकार उपस्थित
काल शुक्रवारी १४ जुलै रोजी रविंद्र महाजनी यांचा मृतदेह एका बंद खोलीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. शेजारी राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वीच रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या मृत्यूची बातमी मुलगा गश्मीरला …
Read More »ज्येष्ठ आभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू.. कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांच्या मृत्यूच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. काल १४ जुलै रोजी तळेगाव दाभाडे येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविंद्र महाजनी हे ७७ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये …
Read More »‘धुंद हवा बहर नवा’.. मराठी सृष्टीतील विस्मृतीत गेलेली नायिका
केवळ एक दोन चित्रपट करून प्रसिद्धी मिळणाऱ्या अनेक नायिका आहेत. त्यातलीच एक म्हणजे कविता किरण. कविता किरण यांनी १९७८ सालच्या व्ही के नाईक दिग्दर्शित आपली माणसं या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारली होती. कविता किरण यांचा हा पहिला मराठी चित्रपट होता. घाऱ्या डोळ्यांची देखणी नायिका त्यांच्या रूपाने मराठी सृष्टीला लाभली होती. …
Read More »साधनाच्या सुनेची भूमिका साकारलीये या अभिनेत्रीने.. अमराठी चेहरा प्रेक्षकांच्या पसंतीस
प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याने बाईपण भारी देवा या चित्रपटाची यशस्वीपणे घोडदौड सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यात चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कोटींची उड्डाणे केली आहेत. कालपर्यंत चित्रपटाने ३६ कोटींचा गल्ला जमवण्यात यश मिळवले आहे. या चित्रपटातील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यात साधनाच्या सुनेने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेले पाहायला मिळाले. ही भूमिका एका …
Read More »त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळली.. परदेशात गेलेल्या कलाकारांचा अविस्मरणीय अनुभव
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेलं आहे. सध्या या शोने टीव्ही क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. मात्र असे असले तरी ही सर्व कलाकार मंडळी सध्या परदेश दौऱ्यावर गेली आहेत. गौरव मोरे, दत्तू मोरे, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप सह हे कलाकार उत्तर अमिरेकीत …
Read More »बाईपण भारी देवा हे नाही तर वेगळंच होतं चित्रपटाचं नाव.. शेवटही होता वेगळा
मराठी सृष्टीला चांगले दिवस आले आहेत असे बोलले जाते कारण गेल्या दोन वर्षांपासून मराठी चित्रपट तो ऐतिहासिक असो वा कौटुंबिक त्याला प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे. गेल्याच महिन्यात ३० जून रोजी प्रदर्शित झालेला बाईपण भारी देवा हा चित्रपट सुध्दा यशस्वी चित्रपटाच्या यादीत बसतो. गेल्या १२ दिवसात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर …
Read More »मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याला दुखापत.. सेलिब्रिटींनी काळजी केली व्यक्त
अभिनय क्षेत्रात काम करत असताना कलाकारांना मोठी मेहनत घ्यावी लागत असते. एखादा स्टंट करत असताना तो त्याच्या जीवावरसुद्धा बेतू शकतो, अशा घटना अनेकदा घडलेल्या पाहायला मिळतात. मोठमोठे कलाकार कुठलाही स्टंट करत असताना डमी आर्टिस्टची मदत घेतात पण मराठी सृष्टीत हे फार कमी वेळा घडते. त्यामुळे कलाकाराला त्याचे १०० टक्के देणे …
Read More »