Breaking News
Home / मराठी तडका / मुखवट्यामागचे खरे चेहरे कळल्यावर, हेच का ते असा प्रश्न पडतो.. मराठी कलाकारांना घर मिळवून देण्यासाठी मी
mahesh tilekar
mahesh tilekar

मुखवट्यामागचे खरे चेहरे कळल्यावर, हेच का ते असा प्रश्न पडतो.. मराठी कलाकारांना घर मिळवून देण्यासाठी मी

महेश टिळेकर हे गेली अनेक वर्षे मराठी सृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. मराठी तारका या त्यांच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या सृष्टीत काम करत असताना महेश टिळेकर यांनी कलाकारांची बाजू जाणून घेण्याचे प्रयत्न नेहमीच केले. अशातच त्यांना कमी किंमतीत घरं मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र यातून त्यांना चांगले वाईट असे अनुभव मिळाले. यावर प्रकाश टाकताना महेश टिळेकर म्हणतात की, कृतज्ञ आणि कृतघ्न कलाकार. कलाक्षेत्रात गेली तीस एक वर्ष काम करीत असताना आपण केलेल्या संघर्षाची जाणिव ठेवून इतरांना जमेल तशी मदत करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला.

mahesh tilekar writer producer director
mahesh tilekar writer producer director

पण नंतर मुखवट्या मागचे खरे चेहरे कळल्यावर आपण मदत केलेले हेच ते कलाकार का? हा प्रश्न नेहमीच पडायचा. पण काही बोटावर मोजणारे आहेत की ज्यांनी जाहीरपणे कृज्ञतापूर्वक केलेल्या मदतीची जाणीव व्यक्त केली. त्यातीलच एक अभिनेता मिलिंद गवळी. बऱ्याच कलाकारांची हयात जाते पण मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. काही उत्तम, नावाजलेले कलाकार मरेपर्यंत भाड्याच्या घरातच राहिल्याचं मी अगदी जवळून पाहिलं आहे. आपल्या ओळखीचा, नावाचा फायदा आपल्या बरोबर इतरही मराठी कलाकारांना व्हावा. त्यांचीही मुंबईत हक्काची घरे व्हावीत म्हणून मी १५ वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले. अनेक खस्ता खाल्ल्यावर प्रयत्नांना यश आले आणि १३ वर्षांपूर्वी माझ्या बरोबर १२ गरजू कलाकार आणि तंत्रज्ञांना सरकारी कोट्यातून मी माफक किमतीतील घरे मुंबईतील उच्चभ्रू भागात मिळवून दिली.

घरे मिळवून दिली त्या सर्व मराठी कलाकारांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहून खूप समाधान वाटलं होतं. पण हे समाधान फार काळ टिकले नाही. चार एकजण  सोडले तर इतरांनी काम झाल्यावर सरड्या प्रमाणे रंग बदलले. घरी जेवायला चहाला नक्की यायचं तुम्ही, असं हक्काने म्हणणाऱ्या कलाकारांनी घरात रहायला येऊन वर्षे  होऊन गेली तरी घरी काही बोलावलं नाही. आणि चांगली किंमत आल्यावर हे कलाकार घरे विकून करोडो रुपयांचा नफा मिळवून मोकळे. असे कर्म दरिद्री कलाकार पाहिल्यावर आपल्या ह्याच मराठी कलाकारांसाठी आपण रक्त आटवून प्रयत्न केले याचा पश्चाताप नक्कीच झाला. यातल्या एका कलाकाराला बँकेचे हफ्ते भरायला पैसे नसताना अनेकदा आर्थिक मदत करूनही पैसे परत मिळवताना या कलाकाराने माझ्या तोंडचं पाणी पळवले होते.

milind gawali mahesh tilekar
milind gawali mahesh tilekar

वर इतकं काय पैश्यासाठी मागे लागलात, तुम्हाला काय कमी आहे? अमुक एक तारखेला पैसे परत देतो. असा शब्द देऊनही अनेक वेळा ते पैसे वेळेवर परत न करणाऱ्या कलाकाराला वेळोवेळी पार्ट्या करायला, बाहेर फिरायला जायला पैसे असायचे. एका अभिनेत्रीने तर माझ्या एका तंत्रज्ञानाला मिळालेला आणि चांगला व्ह्यू असलेला फ्लॅट, तिचा लकी नंबर असल्याचं सांगूनमिळवून देण्यासाठी मला विनंती केली. मी सांगितल्यामुळे आणि मीच फ्लॅट मिळवून दिला असल्यामुळे माझ्या एका शब्दावर त्याने स्वतःचा फ्लॅट अभिनेत्रीला ट्रान्स्फर केला आणि तिचा फ्लॅट घेतला. ही अभिनेत्री तिला लकी नंबर असलेल्या फ्लॅट मध्ये कधीच रहायला आली नाही. तिच्या वेगवेगळ्या कलाकार मित्रांबरोबर फक्त क्षणभर विश्रांतीसाठीच तिथे यायची. पाच वर्षांनी तिथे तो फ्लॅट विकला तेंव्हा चांगला व्हू असल्यामुळे तिला फ्लॅटचे ज्यादा पैसे मिळाले.

करोडो रुपये मिळूनही या कृतघ्न अभिनेत्रीच्या मनात साधा विचारही आला नाही, की ज्या व्यक्तीने त्याचा फ्लॅट आपल्याला ट्रान्स्फर केला त्या तंत्रज्ञाला माणुसकी म्हणून काहीतरी द्यावे. फोन करून मी तिला झापल्यावर तिच्या नशिबात होता म्हणूनच तिला तो फ्लॅट मिळाल्याचे तिने उत्तर दिले. आणि तुमची एवढीच इच्छा असेल मी त्याला काही द्यावे तर मी त्याला चांदीचे एक निरांजन गिफ्ट देते. असं ती बोलल्यावर तिच्यात किती दानत आहे याचा मला अंदाज आला. याच अभिनेत्रीने नंतर एका मोठ्या हुद्द्यावर असलेल्या पैसेवाल्या अधिकाऱ्याबरोबर लग्न केले. काही महिन्यांपूर्वी एका टीव्ही चॅनेलवर ही अभिनेत्री तिच्या नवऱ्या बरोबर समाजकारणात येणार असल्याचे सांगत होती. तो तिचा अभिनय पाहून मी थक्क झालो. अभिनेता मिलिंद गवळी सारखे केलेल्या मदतीची जाणीव ठेवणारे काही कलाकार आहेत म्हणून काही कलाकारांमध्ये माणुसकी आहे याची प्रचिती येते, महेश टिळेकर.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.