Breaking News
Home / जरा हटके / प्रेमाची गोष्ट मालिकेतील चिमुरडी आहे खूपच खास.. सईची भूमिका साकारलीये या बालकलाकाराने
child actor ira parwade
child actor ira parwade

प्रेमाची गोष्ट मालिकेतील चिमुरडी आहे खूपच खास.. सईची भूमिका साकारलीये या बालकलाकाराने

स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेमाची गोष्ट ही नवी मालिका प्रसारित होत आहे. मालिकेत तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची मध्यवर्ती भूमिका आहे. तर अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. मालिकेत अपूर्वा नेमळेकर हिची विरोधी भूमिका आहे. तर संजीवनी जाधव आणि शुभांगी गोखले यांची नोकझोक प्रेक्षकांना विशेष भावली आहे. मुक्ता आणि सागरला जवळ आणण्याचा दुवा म्हणजेच चिमुरडी सई तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. सईमुळेच मुक्ता सागरचे आयुष्य जोडले जाणार हे सर्वश्रुत आहे.

ira parwade tejashri pradhan
ira parwade tejashri pradhan

ही भूमिका त्यामुळे मालिकेत खूपच खास असणार आहे. आज ही बालकलाकार नक्की आहे तरी कोण हे जाणून घेऊयात. प्रेमाची गोष्ट मालिकेतील सईची भूमिका साकारली आहे इरा परवडे हिने. इरा ही सहा वर्षांची आहे आणि आपल्या कुटुंबासोबत पुण्याला वास्तव्यास आहे. इराचे वडील बीजनेसमन आहेत. इराला लहानपणापासून मॉडेलिंगची आवड होती. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिचे आयुष्य त्याच दिशेने घडवले. विविध नामांकित ब्रॅण्डसाठी इराने रॅम्पवॉक केलं आहे. एलिगंट आयकॉन ऑफ पुणे २०२२ या स्पर्धेचे विजेतेपद तिने पटकावले होते. अंकुर या शॉर्टफिल्ममध्ये इराने अभिनय केला. डीडी किसान वाहिनीवरील भूमीकन्या या मालिकेतून इराला टीव्हीवर झळकण्याची नामी संधी मिळाली होती.

ira parwade
ira parwade

वेबसिरीज, जाहिरातीत देखील इरा झळकली आहे. प्रेमाची गोष्ट ही तिची पहिली मराठी मालिका आहे. या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे ह्यांच्यासोबत इराला काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर आता मराठी सृष्टीतील छोट्या पडद्यावर इराचे पदार्पण झाले आहे. प्रेमाची गोष्ट या पहिल्याच मालिकेत तिला अपूर्वा नेमळेकर, तेजश्री प्रधान सोबत काम करण्याची संधी मिळत आहे. इरामुळे या मालिकेच्या सेटवर खेळीमेळीचे वातावरण असते. सई आणि मुक्ताचे बॉंडिंग जुळून आणण्यासाठी तेजश्रीची इरासोबत आता छान गट्टी जमली आहे. त्यामुळे त्यांचे जुळून आलेले बॉंडिंग मालिका अधिक रंगतदार होण्यास मदत करेल. सईच्या भूमिकेसाठी इराचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.