मराठी मालिका ठरलं तर मग हि स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून गेल्या नऊ आठवड्यापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सायली अर्जुनच्या जुळून आलेल्या केमिस्ट्री वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दाखवले. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या बाबतीत अव्वल ठरली आहे. सायली आणि अर्जुनच्या लग्नाचं खरं गुपित खास मित्र चैतन्यला ठाऊक आहे. …
Read More »आपल्या चित्रपटाचं पहिलं तिकीट पत्नीला काढायला लावायचे.. राजा परांजपे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या खास गोष्टी
मराठी चित्रपट सृष्टीचा काळ गाजवल्यानंतर व्ही शांताराम यांनी आपली पाऊलं हिंदी सृष्टीकडे वळवली होती. त्यामुळे १९४७ च्या सुमारास मराठी चित्रपट सृष्टीत अवघे एक ते दोन चित्रपट बनवले जात होते. हा पडता काळ सावरण्याचे काम राजा परांजपे यांनी केले होते. आज २४ एप्रिल राजा भाऊंचा जन्मदिवस, या दिवसाचे खास औचित्य साधून …
Read More »‘ड्रेसवाली’ नावावरून मराठी सेलिब्रिटींना येत आहेत मेसेजेस.. सत्य समोर येताच मिळाला आश्चर्याचा सुखद धक्का
सेलिब्रिटी विश्वात रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. प्रेक्षकांकडुन ट्रोल होणं असो अथवा त्यांच्या टीकेला उत्तर देणं असो, या गोष्टी तर वारंवार चर्चेचा विषय ठरतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून मराठी सेलिब्रिटींना ‘ड्रेसवाली’ या नावाने अकाउंट असलेल्या व्यक्तीकडून मेसेजेस येऊ लागले होते. ही व्यक्ती बऱ्याचशा सेलिब्रिटींना मेसेजेस पाठवून त्यांच्याशी संपर्कात राहू पाहत …
Read More »मानसी नाईकने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी.. नवीन प्रवासाला सुरुवात
गेल्या वर्षात मानसी नाईकच्या घटस्फोटाच्या चर्चेमुळे चंदेरी दुनियेत एकच खळबळ उडाली होती. अवघ्या दीड वर्षाच्या संसारानंतर मानसी नाईक प्रदीप खरेरा पासून वेगळी होतीये ही बातमी तिने मीडिया माध्यमांशी बोलताना सांगितली होती. यानंतर ती प्रदीप पासून का वेगळी होतीये याचेही कारण तिने सांगितले होते. प्रदीपने आपल्याशी केवळ पैसे मिळवण्यासाठीच लग्न केले …
Read More »स्टार प्रवाहवरील नवीन मालिकेत झळकणार ही फ्रेश जोडी.. ठरलं तर मग मालिकेसमोर येणार नवे आव्हान..
स्टार प्रवाहवरील बहुतेक मालिकांनी टीआरपीचा आलेख चढताच ठेवलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या भेटीला ही वाहिनी नवनवीन मालिका आणू पाहत आहे. लवकरच सुरू होत असलेल्या नव्या मालिकेमुळे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या मालिकेत आता काही दिवसांपासून सकारात्मक बदल होताना दिसू लागले आहेत. येत्या …
Read More »माझ्या आयुष्याची सुरुवातच लोकधारामधल्या.. आदेश बांदेकर यांनी सांगितला शाहीर साबळेंच्या सहवासातला प्रवास
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या पिढीला शाहीर साबळे कसे होते, त्यांचा जीवनप्रवास किती खडतर होता याचा उलगडा होणार आहे. शाहीर साबळे म्हणजेच कृष्णा साबळे यांचे बालपण अमळनेर येथील आजीकडे गेले. कृष्णाने गाण्यापासून दूर राहावे म्हणून आजीने तापत्या तव्यावर ठेवले होते. अगदी सातवीच्या …
Read More »अ आ आई, म म मका.. गीतातील बालकलाकार आज आहे हिंदी चित्रपट सृष्टीचा प्रसिद्ध चेहरा
दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित एक धागा सुखाचा हा चित्रपट १९६१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रमेश देव, सीमा, शरद तळवलकर, उषा किरण, दामूअण्णा मालवणकर असे बरेच कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात एका बालकलाकारावर चित्रित झालेलं अ आ आई, म म मका, मी तुझा मामा दे मला मुका हे …
Read More »या इंडस्ट्रीने मला अलगद बाजूला केलं.. म्हणणाऱ्या अभिनेत्याचे पुनरागमन
सतीश पुळेकर हे उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीत ओळखले जातात. अगदी प्रशांत दामले सह अनेक नामवंत कलाकारांना घडवण्याचे त्यांनी काम केलेले आहे. नाटकांचे दिग्दर्शन करत असताना शिस्तबद्ध राहणे आणि वेळ पाळणे अशा गोष्टींमुळे ते प्रचंड कडक शिस्तीचे असल्याचा शिक्का त्यांच्यावर बसला. याचमुळे हळद रुसली कुंकू हसलं, बे दुणे …
Read More »मी डीडीएलजे मध्ये असलो असतो पण माझ्या दाढीमुळे.. मिलिंद गुणाजी यांनी केला मोठा खुलासा
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या १९९५ सालच्या बॉलिवूड चित्रपटाने अभिनय, स्टोरी, गाणी सर्व स्तरांवर इतिहास रचला. थिएटरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक काळ चालणारा हा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजी महत्वपूर्ण भूमिकेत असणार होते. मात्र दाढीमुळे त्यांना ही संधी गमावावी लागली होती. मिलिंद गुणाजी यांनी एका मुलाखतीत सिमरनच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका …
Read More »असा हवाय समृद्धी केळकरला लग्नासाठी मुलगा..
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली समृद्धी केळकर सध्या आगामी प्रोजेक्ट निमित्त चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा विजेता अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर दोन कटिंग ३ या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यानिमित्ताने समृद्धी आणि अक्षयने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी समृद्धीला लग्नासाठी कसा नवरा …
Read More »