मालिका रंजक व्हावी म्हणून मूळ कथानकात थोडेफार बदल करण्यात येतात. एखादा ट्विस्ट, धक्कादायक घडामोडी अथवा नव्या कलाकारांची एन्ट्री हे प्रत्येक मालिकेचा एक अविभाज्य घटक ठरला आहे. असाच काहीसा रंजक ट्विस्ट माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने देखील आणण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच मालिकेत शेफालीच्या आईची एन्ट्री होत आहे. शेफाली आणि समीर यांच्यात हळूहळू प्रेम फुलू लागलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमाची गाडी आता पुढे सरकण्यासाठी शेफालीच्या आईची एन्ट्री होणे आवश्यक आहे. कथानकाची ही गरज लक्षात घेऊनच शेफालीची आई म्हणजेच मोहिनी येत्या काही भागात प्रेक्षकांसमोर दाखल होत आहे.
ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री गौरी केंद्रे साकारणार आहेत. गौरी केंद्रे या प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच शिवाय त्या बालनाट्य तज्ञ म्हणूनही ओळखल्या जातात. हिंदी मराठी चित्रपट तसेच मालिका आणि नाटकांमधून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. गौरी केंद्रे या वामन केंद्रे यांच्या पत्नी होय. वामन केंद्रे हे महाराष्ट्रातील एक विख्यात नाट्यदिग्दर्शक, नाट्यअभ्यासक, नाट्यप्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. अनेक नवख्या तसेच जाणकार कलाकारांना त्यांनी आपल्या अभिनय कार्यशाळेत प्रशिक्षण दिले आहे. गौरी व वामन केंद्रे यांचा मुलगा ऋत्विक केंद्रे हा देखील सिने नाट्य तसेच मालिका अभिनेता आहे. मानसीचा चित्रकार तो या मालिकेतून त्याने पदार्पण केले होते.
ड्राय डे, झुलवा, वो चार पन्ने, प्रिया बावरी अशा नाटक चित्रपटातून तो झळकला आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत गौरी केंद्रे मोहिनीची व्यक्तिरेखा साकारणार आहेत, ही भूमिका थोडीशी मिश्किल स्वभावाची असणार आहे. शेफाली मोहिनी या दोघी मायलेकी मालिकेतून हलके फुलके वातावरण निर्माण करताना आहेत. मोहिनीच्या येण्याने समीरचा गोंधळ कसा उडणार हे मात्र नक्की. परी आणि आजोबांची आता चांगली गट्टी जमली आहे. त्यामुळे लवकरच नेहा यशचे लग्न होणार असल्याची चिन्ह मालिकेतून दिसू लागली आहेत. ह्या घडामोडी अधिक रंजक होण्यासाठी मोहिनीचे पात्र मालिकेत दाखल केले जाणार आहे. या भूमिकेसाठी गौरी केंद्रे यांना मनःपूर्वक शुभेच्छा!