Breaking News
Home / मराठी तडका / देवकी चित्रपटातले हे दोन बालकलाकार आता दिसतात असे.. साकारत आहेत मुख्य भूमिका
devki movie alka kubal shilpa tulaskar

देवकी चित्रपटातले हे दोन बालकलाकार आता दिसतात असे.. साकारत आहेत मुख्य भूमिका

रिफ्लेक्शन एंटरटेनमेंट नेटवर्क प्रस्तुत देवकी हा मराठी चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. मिलिंद उके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या देवकी या कादंबरीवर आधारित आहे. अलका कुबल, शिल्पा तुळसकर, सुधीर जोशी, मिलिंद गवळी, गिरीश ओक, अभिराम भडकमकर यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्या. या कसलेल्या कलाकारांना साथ दिली ती विहंग भणगे आणि अनुराग वरळीकर या दोन बालकलाकारांनी. देवकी चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता २१ वर्षे लोटली आहेत. त्यामुळे हे बालकलाकार आता कसे दिसत असतील याची उत्सुकता निर्माण होते.

devki movie alka kubal shilpa tulaskar
devki movie alka kubal shilpa tulaskar

मात्र हे दोन्ही बालकलाकार तुमच्या चांगलेच परिचयाचे असतील कारण हे दोघेही चित्रपट आणि मालिकेत सक्रिय असलेले पाहायला मिळाले आहेत. त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. विहंग भणगे हा बालकलाकार म्हणून मराठी हिंदी सृष्टीत चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. वयाच्या अवघ्या दीड वर्षातच त्याने स्टेजवर पाऊल टाकले होते. विहंगचे बालपण डोंबिवली मध्ये गेले. त्याचे वडील विवेक भणगे हे व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. विहंग दीड वर्षाचा असताना नवरात्रीच्या कार्यक्रमात त्याने किर्तनकाराची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्याच्या आईने त्याच्याकडून एक श्लोक पाठ करून घेतला होता. अवघ्या दीड वर्षाचा विहंग श्लोक म्हणेल की नाही याची त्यांना मुळीच खात्री नव्हती.

vihang bhanage anurag worlikar
vihang bhanage anurag worlikar

विहंगने श्लोक म्हणताच उपस्थितांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले. राज्यनाट्य स्पर्धा, उठी उठी गोपाळा सारख्या नाटिकामधून विहंग बालकलाकार म्हणून झळकला. पुढे देवकी चित्रपटाने विहंगला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. बालकलाकार म्हणून विहंगने १७ मराठी मालिका चित्रपट तसेच ४ हिंदी मालिका साकारल्या. ई टीव्ही मराठी वाहिनीवर ‘बालपण मोठ्यांचे’ हा कार्यक्रम सादर होत असे. या कार्यक्रमात विहंगने अनेक मोठमोठ्या कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. मधल्या काळात शिक्षणावर लक्ष्य केंद्रीत व्हावे म्हणून त्याने अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला. डि जी रुपारेल कॉलेजमधून त्याने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. बॉईज या चित्रपटातून त्याने मराठी सृष्टीत पुनरागमन केले.

चूक भूल द्यावी घ्यावी मालिकेत त्याने टेण्या गुरुजीचे पात्र साकारले. गुलमोहर, जय भवानी जय शिवाय या मालिकांमधून तो अभिनय क्षेत्रात सक्रिय झाला. देवकी चित्रपटात विहंगसोबत अनुराग वरळीकर या बालकलाकाराने देखील महत्वाची भूमिका साकारली. देवकी हा अनुरागने अभिनित केलेला पहिला मराठी चित्रपट. दे धमाल या मालिकेतही तो झळकला. पोर बाजार, मिशन चॅम्पियन, निवडुंग, बारायण, डॉ डॉन, वृत्ती या मालिका आणि चित्रपटातून अनुराग प्रेक्षकांच्या भेटीस येत राहिला आहे. डॉ डॉन या मालिकेत तो श्वेता शिंदेच्या मुलाची भूमिका साकारताना दिसला. अभिनय क्षेत्रासोबतच अनुरागने मास कम्युनिकेशनचे धडे गिरवले आहेत. यासोबतच त्याला दिग्दर्शन क्षेत्राची देखील विशेष आवड आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.