Breaking News
pavitra rishta ankita lokhande susahnt usha nadkarni
pavitra rishta ankita lokhande susahnt usha nadkarni
Home / मालिका / उषा नाडकर्णी पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वात दिसणार नाही… हे आहे कारण

उषा नाडकर्णी पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वात दिसणार नाही… हे आहे कारण

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘पवित्र रीश्ता’ ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. २००९ साली या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता आणि कित्येक वर्षे ही मालिका टीव्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिली होती. अर्थात मालिकेने लीप घेतल्यानंतर सुशांतने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याने रंगवलेली मानव ची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. वाढत्या वयाच्या भूमिका करायच्या नाहीत या निर्णयावर ठाम असलेल्या सुशांतने त्याचमुळे ही मालिका न करण्याचा निर्णय घेतला होता. आता लवकरच अर्चना आणि मानव यांच्या या प्रेमकहाणीचा सिकवल “पवित्र रिश्ता २.०” प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी या मालिकेच्या सिकवलची मागणी केली होती त्यावर आता निर्णय घेण्यात आला असून कलाकारांचीही निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. पवित्र रिश्ताच्या या नव्या सिजन मध्ये प्रेक्षकांना नेमके काय पाहायला मिळणार आणि कोणकोणते कलाकार झळकणार याबाबत उत्सुकता निर्माण होत आहे.

पहिल्या सिजनमध्ये मराठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मानवच्या आईची भूमिका चोख बजावली होती. हे दमदार पात्र पुन्हा एकदा मालिकेतून दिसणार का याबाबत नुकताच खुलासा करण्यात आला आहे. उषा नाडकर्णी सध्या महा’ मारीमुळे कुठलाच प्रोजेक्ट स्वीकारणार नाहीत असे सांगितले जात आहे. उषा नाडकर्णी यांचे वय ७७ वर्षे असून सध्या कुठलीही रिस्क घेण्यास त्या तयार नाहीत शिवाय त्यांना डायबिटीस देखील असल्याने त्या ही मालिका करत नसल्याचे सांगितले जात आहे. सुशांतच्या निधनाने तोही या मालिकेत नसणार आणि उषा नाडकर्णी देखील नसणार अशी खंत आता प्रेक्षकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रेक्षक देत असल्याने चाहते काहीसे नाराज आहेत.

जर तुम्हाला नवनवीन कलाकारांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तसेच आम्हाला पत्रे देखील लिहू शकता. आमची टीम जास्तीत जास्त मागणी आलेल्या चाहत्यांना प्राधान्य देईल. आमच्याबरोबर जोडलेले रहा आणि आमच्या फेसबुक पेज वर देखील आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी लाईक, फॉलो आणि शेअर करा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.