Breaking News
gautami deshpande
gautami deshpande
Home / मराठी तडका / माझा होशील ना मालिकेतील ‘सईची’ रिअल लाईफ स्टोरी

माझा होशील ना मालिकेतील ‘सईची’ रिअल लाईफ स्टोरी

झी मराठी वाहिनीवर माझा होशील ना मालिका प्रसारित होत आहे. मालिकेतील बंधू मामांचा आणि गुल्लू मामींचा संसार सुरळीत चालावा म्हणून सई आणि आदित्यची धडपड प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दादा मामाचा बंधू मामाने केलेल्या लग्नाला विरोध असल्याने गुल्लूला घरात घेण्यासाठी मालिकेत हा सर्व आटापिटा सुरू झाला आहे. येत्या काही भागात तो आनंदाचा क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळेलच पण तुर्तास मालिकेतील सईबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात..

मालिकेतली सई साकारली आहे अभिनेत्री “गौतमी देशपांडे” हिने. गौतमी देशपांडे ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण आहे दोघी बहिणी दिसायला अगदी जुळ्या बहिणींप्रमाणेच सेम टू सेम आहेत. मृण्मयी आणि गौतमीला अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते असे म्हणायला हरकत नाही कारण गौतमीची आई आणि त्यांचे आजोबा रंगभूमीवरचे जाणते कलाकार. त्यांच्याच प्रेरणेने या दोघी बहिणी शालेय जीवनापासून सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी सहभागी होत. गौतमीने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे शिवाय नृत्य, गायन आणि अभिनय अशा तिन्ही क्षेत्रात ती निपुण आहे. सोनी मराठी वरील सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून गौतमीने अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. याअगोदर कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांतून तिने कामं केली आहेत. मन फकिरा चित्रपटात तिला गाण्याची संधी मिळाली होती शिवाय माझा होशील ना मालिकेतूनही तिने कित्येक गाणी प्रेक्षकांना ऐकवली आहेत. माझा होशील ना ही तिची प्रमुख भूमिका असलेली दुसरी मालिका आहे यातील सईच्या भूमिकेने गौतमीला अमाप प्रसिद्धी मिळवुन दिली आहे. रोखठोक सईची भूमिका प्रेक्षकांना देखील खूपच भावल्याने गौतमीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. या मालिकेसाठी अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला कलाकार.इन्फो टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा…

जर तुम्हाला नवनवीन कलाकारांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तसेच आम्हाला पत्रे देखील लिहू शकता. आमची टीम जास्तीत जास्त मागणी आलेल्या चाहत्यांना प्राधान्य देईल. आमच्याबरोबर रहा आणि आमच्या फेसबुक पेज वर देखील आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी लाईक व फॉलो करा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.