डिंपल आणि डॉ अजितकुमारच्या विवाह सोहळ्याचे शूटिंग पूर्ण झाले असून देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप….
झी मराठीवरील देवमाणूस मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेतील टोण्या, डिंपल सरू आज्जी, बज्या, नाम्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. परंतु आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मालिकेत डिंपल आणि डॉ अजितकुमार यांच्या लग्नाचा सोहळा नुकताच चित्रित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
मालिकेत लवकरच डॉक्टरला अटक देखील होणार असल्याने देवमाणूस मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याने झी मराठी वर आता नव्या मालिकेची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. तुर्तास दिव्या सिंगचा तपास योग्य दिशेने वाटचाल करत असल्याने देवीसिंग लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आहे. डिंपल आणि डॉ अजितकुमारच्या लग्न सोहळ्यातच हा सर्व गोंधळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने मालिका रंजक होताना दिसत आहे. येत्या काही दिवसातच देवमाणूस मालिकेतल्या या रंजक घडामोडी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार म्हटल्यावर मालिकेचे चाहते काहीसे नाराज झाले आहेत परंतू डॉ पोलिसांच्या कधी तावडीत सापडणार याचीही उत्कंठा त्यांना लागून होती.