Breaking News
tanvi mundle pahile na mi tula
tanvi mundle pahile na mi tula
Home / मराठी तडका / पाहिले न मी तुला मालिकेतील मनूची रिअल लाईफ स्टोरी…

पाहिले न मी तुला मालिकेतील मनूची रिअल लाईफ स्टोरी…

झी मराठी वाहिनीवर पाहिले न मी तुला ही मालिका प्रसारित होत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मने देखील जिंकून घेतली आहेत. मानसी आणि अनीकेत यांची लव्हस्टोरी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. शशांक केतकरने प्रथमच या मालिकेतून विरोधी भूमिका साकारली आहे त्यामुळे त्याला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी हे दोघे कलाकार प्रमुख नायक नायिकेची भूमिका बजावत आहेत. आज अभिनेत्री “तन्वी मुंडले” हिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

तन्वीने मुंबई विद्यापीठातून फिजिक्स मधून बीएस्सीची पदवी प्राप्त केली आहे. अभिनयाची आवड असलेल्या तन्वीने ललित कला केंद्र मध्ये प्रवेश मिळवला होता. ‘अ रिस्पेक्टेबल वेडिंग’, ‘कुणाचा कुणाला मेळ न्हाई’ अशा नाटकांतून तीने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर येत्या २ जुलै २०२१ रोजी सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेला “COLORफुल” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटात तन्वी देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा तिने अभिनित केलेला पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. झी मराठीची पाहिले न मी तुला या मालिकेतून प्रथमच ती छोट्या पडद्यावर झळकत आहे. त्यामुळे पदर्पणातली ही पहिली वहिली मालिका तिच्यासाठी खूप खास ठरत आहे. महेश कोठारे यांनी आपल्या मालिकेतून तन्वीला प्रमुख नायिकेची भूमिका साकारण्याची संधी दिली. मानसीच्या निरागस भूमिकेमुळे तन्वी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेसाठी आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी तन्वीला खूप खूप शुभेच्छा…

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.