Breaking News
rekha rao marathi actress
rekha rao marathi actress
Home / जरा हटके / मराठी चित्रपटातून गायब झालेली ही अभिनेत्री सध्या आहे तरी कुठे…

मराठी चित्रपटातून गायब झालेली ही अभिनेत्री सध्या आहे तरी कुठे…

धरलं तर चावतंय, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, शुभ मंगल सावधान अशा अनेक मराठी चित्रपटातून नायिका बनून आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली ही अभिनेत्री आहे “रेखा राव”. अमराठी असूनही अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांच्या तोडीसतोड असणारी ही अभिनेत्री मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी सृष्टीतून गायब झालेली पाहायला मिळत आहे. रेखा राव यांनी मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटातून आणि मालिकांमधूनही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु सध्या त्या कुठे असतात आणि कशा आहेत याबाबत मीडियामध्ये फारसे पाहायला मिळत नाही. आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

अभिनेत्री रेखा राव या मूळच्या बंगलोरच्या. लहानपणापासूनच त्यांनी नृत्याचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी अनेक मोठ्या मंचावरून नृत्याची कला सादर केली होती. हिंदी चित्रपट अभिनेते किशोर कुमार यांच्यासमोरही त्यांनी आपली कला सादर करण्याची संधी मिळाली होती. इथूनच त्यांच्यात अभिनयाची गोडी निर्माण झाली असे म्हणायला हरकत नाही. मराठी बोलता येत असल्याने सुरुवातीला मराठी चित्रपटात नायिकेच्या भूमिका साकारून जम बसवला. बहुतेक चित्रपटात अशोक सराफ यांच्या सोबत त्यांना झळकण्याची संधी मिळाली. पुढे हिंदी चित्रपटातून सह अभिनेत्री बनून तेहजीब, हम दिल दे चुके सनम, हर दिल जो प्यार करेगा असे बरेचसे गाजलेले चित्रपट साकारले. हम दिल दे चुके सनम मधली त्यांनी साकारलेली विरोधी भूमिका कौतुकास्पद ठरली होती. मधल्या काळात त्यांनी हिंदी मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. कधी आई बनून तर कधी सह नायिका बनून त्या प्रेक्षकांसमोर येत राहिल्या .शुभ विवाह या त्यांनी अभिनित केलेल्या हिंदी मालिकेला चांगली लोकप्रियता देखील मिळाली होती.

रेखा राव सध्या आपल्या कुटुंबासोबत बंगलोरला स्थायिक झाल्या आहेत. तिथे राहून काही दाक्षिणात्य चित्रपट आणि मालिकेतून त्या झळकत आहेत. त्यामुळे मराठी आणि हिंदी सृष्टीतून त्या गायब झाल्याचेच चित्र सध्या तरी दिसत आहे. ट्रॅव्हलिंग, डान्सची त्यांची ही आवड आजही त्या जोपासताना दिसतात. मराठी चित्रपटातला एक काळ गाजवलेली नायिका म्हणून आजही प्रेक्षक रेखा राव यांना विसरलेले नाहीत आणि विसरणारही नाहीत. आज इतकी वर्षे लोटली तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील ते तेज मात्र असेच अबाधित असलेले पाहायला मिळते आहे. आमच्या समूहाकडून रेखा राव यांना सुदृढ आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

जर तुम्हाला नवनवीन कलाकारांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तसेच आम्हाला पत्रे देखील लिहू शकता. आमची टीम जास्तीत जास्त मागणी आलेल्या चाहत्यांना प्राधान्य देईल. आमच्याबरोबर जोडलेले रहा आणि आमच्या फेसबुक पेज वर देखील आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी लाईक, फॉलो आणि शेअर करा.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.