गेले काही दिवस कोकणवासीय आपत्ती ग्रस्त झाले असून, पुराचे पाणी ओसरण्यास जसजशी सुरुवात झाली तसतसे अनेक ठिकाणांहून मदतीचे ओघ सुरू झाले आहेत. अशात आपले मराठी कलाकार मागे कसे पडतील. मराठी कलाकारांनी देखील होईल तशी मदत आपल्या कोकणी तसेच कोल्हापूर सांगली मधील बांधवांसाठी करण्याचे ठरवले आहे. या मदतीच्या हातांची यादी आता मोठी होताना दिसत आहे.
भरत जाधव असो वा सिद्धार्थ जाधव हे सर्वच कलाकार या मदतीमध्ये धावून येताना दिसत आहेत. अभिनेता भरत जाधवने आपण कोणकोणत्या प्रकारे या बांधवांना मदत करू शकतो याचीही लिस्ट तयार करून दिली आहे. सोशल मीडियावर भरत जाधव यांनी मदतीचे आवाहन आपल्या चाहत्यांना केले होते. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, ” ह्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत कारण थेंबे थेंबे तळे साचे. सगळ्यांनी थोडं थोडं प्रयत्न केले तर या महापुरातून सावरण्यासाठी मदतीचा महासागर तयार होईल…! फक्त कोकणच नाही तर सांगली, कोल्हापूर, सातारा, विदर्भ, मराठवाडा जिथे जिथे आवश्यक असेल तिथे आपापल्या परीने शक्य ती मदत पोहोचवू या.”