Breaking News
Home / मराठी तडका / एका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी
urmila nimbalkar
urmila nimbalkar

एका लिपस्टिकमुळे या मराठी अभिनेत्रीची काढली लायकी

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकार ट्रोलिंगला सामोरे जाताना दिसत आहेत. अगदी नुकतीच सुरू झालेली सारेगमप लिटिल चॅम्पस मधले पाचही परीक्षक असो वा मृण्मयी देशपांडेचे सूत्रसंचालन या सर्वनाच  ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. काही वर्षांपूर्वीच हे लिटिल चॅम्पस आता परीक्षक कसे बनू शकतात आणि मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालन करताना खूपच ओव्हर करते अशा अनेक टीका त्यांच्यावर  सतत होत असतात. कलाकारांच्या खाजगी आयुष्यबाबतही तसेच घडलेले पाहायला मिळते. अगदी उघडपणे बोलणारी हेमांगी कवी असो वा सतत  प्रेग्नन्सीच्या अपलोड केलेल्या फोटोमुळे ट्रोल झालेली अभिनेत्री उर्मिला निंबाळकर असो या सर्वांनाच ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. यामुळे हे कलाकार नेहमीच चर्चेचा विषय ठरताना दिसतात. मात्र यापलीकडे जाऊन अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने आपल्यावर झालेल्या चोरीच्या आरोपावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती नेमकी काय म्हणाली ते पाहुयात…

urmila nimbalkar pregnancy photo shoot
urmila nimbalkar pregnancy photo shoot

तर झालं असं..
एका मोठ्या हिंदी मालिकेच्या सेटवर,
त्या मालिकेतील हिरोईनची मेकअप आणि हेअर ड्रायर ची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून मी @maccosmeticsindia ची एक लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रॅंडेड आणि माझा ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे मी प्रत्तेकच शुटिंगमधे ती वापरायचे. मराठी कलाकाराच्या पर डे पेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक माझ्या हातात दिसल्याने, माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला. या प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याने, साहजिकच त्यांना मी माझी संपुर्ण बॅग चेक करु दिली. माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडला गेलेला असून, माझे वडिल व्याख्यान आणि प्रवचने करतात. माझ्या कुटुंबातील प्रत्तेक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करतोय.

urmila nimbalkar beautiful actress
urmila nimbalkar beautiful actress

कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी २ बस आणि २ लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ॲाडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करतीय. बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिक मुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला.
परवा @maccosmeticsindia चा मला मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॅाडक्ट पहिल्यांदा लॅांच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता
आपल्या आवडत्या ब्रॅंडबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद आहेच पण
माझा हा प्रवास मलाच आनंदाचा अभिमानाचा वाटतो!”….

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.