Breaking News
Home / ठळक बातम्या / उमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..
raj kundra sai tamhankar shamita shetty
raj kundra sai tamhankar shamita shetty

उमेश कामत नंतर या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे नाव राज कुंद्रा प्रकरणात..

अश्लील चित्रफीत निर्मिती प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. ‘हॉटशॉट्स’ या ऍपद्वारे चित्रफीत पब्लिश केल्या जात होत्या मात्र पोलिसांच्या भीतीने या अश्लील चित्रफीतींचा व्यवसाय पुढेही चालू रहावा याचा प्लॅन बी राज कुंद्राकडे अगोदरच तयार होता. याचा उलगडा व्हाट्सएपच्या चॅटवरून झाला. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी केवळ नावात साधर्म्य असल्याने मीडियामध्ये आरोपी उमेश कामतच फोटो म्हणून मराठी अभिनेता उमेश कामतचा फोटो व्हायरल केला. याबाबत मीडियाने माफी मागितली असली तरी उमेशने त्या मीडियाविरोधात कायदेशीर तक्रार करणे गरजेचे आहे असे सर्वांनी सुचवले. या प्रकरणात आपल्या फोटोचा गैरवापर केल्याने उमेशला नाहक त्रास सहन करावा लागला.

shamita shetty shilpa shetty kundra
shamita shetty shilpa shetty kundra

उमेश कामत पाठोपाठ आता अभिनेत्री “सई ताम्हणकर” हिचे नाव देखील राज कुंद्रा प्रकरणात गोवले जात आहे. याबाबत सविस्तर बातमी अशी की, राज कुंद्रा ह्याचा प्लॅन बी अगोदरच तयार होता तो लवकरच नवीन अँप बनवण्याच्या तयारीत होता याची माहिती गहना विशिष्ठ हिने नवभारत टाइम्सला दिली. या मुलाखतीत गहना म्हणाली की, राज कुंद्राला अटक होण्यापूर्वी मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले होते तिथे मला बॅलिफेम या अँपबद्दल समजलं. चॅट शो, म्युजिक शो, रिऍलिटी शो , चित्रपट असे बरेच काही या अँपद्वारे प्रसिद्ध केले जाणार होते मात्र या अँपमध्ये कुठेही अश्लील चित्रफीत ते दाखवणार नव्हते. त्यातील एका स्क्रिप्टसाठी शिल्पा शेट्टी ची बहीण शमीता शेट्टीच्या नावाचा विचार केला होता. तर दुसऱ्या स्क्रिप्टसाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर व इतर कलाकारांचे नाव विचारात होते मात्र आमचे पूर्ण प्लॅन तयार होण्यागोदरच राज कुंद्राला अटक केली गेली.

sai tamhankar
sai tamhankar

कीर्ती सेननची प्रमुख भूमिका असलेल्या “रिहाई दे” चित्रपटात सई ताम्हणकर महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे हिंदी सृष्टीत सई चांगलाच जम बसवताना दिसत आहे मात्र गहनाने केलेल्या खुलास्यात सई ताम्हणकर राज कुंद्राच्या नव्या अँपसाठी काम करणार असल्याचे सांगितले. अर्थात यात कुठल्याही अश्लील बाबींचा समावेश होणार नसला तरी सध्या सोशल मीडियावर सई ताम्हणकरच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या प्रकरणाबाबत अजून सई ताम्हणकरने स्वतः कुठला खुलासा केलेला नाही मात्र लवकरच ती याबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.