Breaking News
Home / बॉलिवूड / अभिमानास्पद ! हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..
prabhas and devdatta nage
prabhas and devdatta nage

अभिमानास्पद ! हा मराठमोळा अभिनेता दिसणार प्रभासच्या आदीपुरुष सिनेमात..

नमस्कार,

मित्रहो कलाकार हा नेहमीच संधीचा भुकेला असतो, जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा त्या संधीचे सोने करण्यास कलाकार अतोनात मेहनत घेतात. त्यामुळे अचानक मोठी संधी मिळणे हे कोणत्याही कलाकारासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. बॉलिवूड म्हणजे एक अतरंगी दुनिया आहे, इथे येणारा प्रत्येक जण पडद्यावर झळकतोच फक्त मन लावून मेहनत करावी लागते. तसेच या चंदेरी दुनियेत कधी कोणाचे नशीब पालटेल याचा नेम नसतो, प्रत्येक कलाकाराच्या कलेची योग्य पारख केली जाते आणि ही पारख शक्यतो रसिकांच्या हातात असते. जर रसिकांना एखादा कलाकार खूप आवडला तर त्याला या चंदेरी दुनियेतील तारा बनण्यास कोणीच अडवू शकत नाही.

फिल्म इंडस्ट्री कोणतीही असो, तेथील कलाकार अभिनय कसा साकारतात याकडे अनेकांचे लक्ष असते. त्यामुळे फिल्म इंडस्ट्री मराठी असो किंवा हिंदी, यामधील कलाकार मात्र उत्कृष्ट आहेत, पण बॉलिवूड मध्ये काम करण्याची संधी मिळणे ही बाब खूप अभिमानाची आहे आणि हा अभिमान आता या मराठी अभिनेत्याच्या वाट्याला आला आहे. मराठी चित्रपट सृष्टीचे चाहते या अभिनेत्यासाठी खूप आनंदी झाले आहेत. त्याला बॉलिवूड मध्ये संधी मिळाल्या मुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.

devdatta nage best memories
devdatta nage best memories

बॉलिवूड मधील बाहुबली म्हणून प्रसिद्ध असणारा प्रभास याचा नवा चित्रपट “आदीपुरुष” हा खूप चर्चेत आहे, भरपूर लोकांना हा चित्रपट कसा असेल याची उत्सुकता लागली आहे. पण चाहते फार हर्षित झाले आहेत कारण या चित्रपटात एका मराठी अभिनेत्याला संधी दिली आहे. हा मराठी अभिनेता म्हणजे देवदत्त नागे हा आहे, देवदत्तला बॉलिवूड मध्ये संधी मिळाली आहे ही खूप गर्वाची बाब आहे. त्याच्या सर्व चाहत्यांना खूप जास्त आनंद झाला असून त्याला या चित्रपटात पाहण्यासाठी सर्वजण खूप उत्सुक आहेत.

“आदीपुरुष” हा चित्रपट खूपच रंजक असणार अशी आशा आहे, हा चित्रपट रामायनावर आधारित आहे. याचे दिग्दर्शक ओम राऊत हे असून याची सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुरू असते. यामध्ये श्रीरामाची भूमिका प्रभास साकारणार असून ,लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंघ दिसणार आहे. तसेच प्रभू श्रीराम यांची सीता म्हणून क्रिती सेनन दिसणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहेत. हा चित्रपट खूपच सुंदर असेल, अगदी भव्य दिव्य रामायनावर आधारित असणारा हा चित्रपट पाहण्यासाठी भरपूर जण उत्सुक आहेत.

devdatta nage workout photos
devdatta nage workout photos

या चित्रपटात हनुमानाची भूमिका देवदत्त साकारणार असून भरपूर लोक त्याची ही भूमिका पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत, देवदत्तची याआधी खंडेरायाची भूमिका मराठी रसिकांनी अगदी डोक्यावर घेतली होती. या भूमिकेत त्याच्या चेहऱ्यावरील तेजस्वीपणा अनेकांना भावतो आणि आता पुन्हा त्याची हनुमानाची भूमिका पाहण्यासाठी लोक खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटाची भव्यता खूपच सुंदर असणार हे निश्चित आहे त्यामुळे यातील सर्व कलाकारांना kalakar.info संपूर्ण क्रू कडून खूप खूप शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.