Breaking News
Home / मालिका / आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत…
ashwini mahangade hindi serial
ashwini mahangade hindi serial

आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत…

आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती घटस्फोटानंतर तिच्या आईच्या घरी राहत आहे. हाताला काम मिळावे या प्रयत्नात असतानाच अनघा तिची भेट घेते आणि आश्रमात काम करण्याचे सुचवते. या आश्रमातील महिलांना अरुंधती आठवड्यातून एकदा गाणं देखील शिकवणार आहे. त्यामुळे मालिका सध्या रँक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. तुर्तास आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री पहिल्यांदाच हिंदी मालिकेत चमकणार आहे ही अभिनेत्री नेमकी कोण आहे ते पाहुयात…

ashwini mahangade vintage marathi women style
ashwini mahangade vintage marathi women style

आई कुठे काय करते या मालिकेत काम करत असताना काही कलाकारांना हिंदी मालिकेत देखील काम करण्याची संधी मिळाली होती. अशीच एक संधी आता मालिकेत अनघाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला मिळणार आहे. अनघाची भूमिका अभिनेत्री “अश्विनी प्रदीपकुमार महांगडे ” हिने साकारली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेतून अश्विनीने रानूअक्काची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या या ऐतिहासिक भूमिकेचे खूप कौतुक देखील झाले होते. अस्मिता ही अश्विनीने साकारलेली पहिली मराठी मालिका होती. या मालिकेतून ती डिटेक्टिव्हच्या भूमिकेत पाहायला मिळाली. अश्विनीने रयतेचे स्वराज्य या प्रतिष्ठाणची स्थापना केली आहे. यातून आजवर अनेक सामाजिक कार्य तिने केले आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री अशी तिची मराठी सृष्टीत ओळख आहे. लवकरच अश्विनी हिंदी मालिकेत देखील महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सोनी टीव्ही वर “मेरे साईं” ही हिंदी मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेतून आजवर अनेक मराठी कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे. अभिनेते तुषार दळवी यांनी या मालिकेतून साईंची भूमिका साकारली आहे.

ashiwini with amol kolhe
ashiwini with amol kolhe

याच मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत अश्विनी झळकणार आहे. तिची ही भूमिका काहीशी विरोधी असल्याचे तिने सांगितले आहे. अश्विनीची ही पहिलीच हिंदी मालिका असल्याने आपल्या भूमिकेबाबत ती फारच उत्सुक असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेतला तिचा लूक देखील समोर आला असून काही भागांमध्ये तिच्या अभिनयाची झलक तुम्हाला पहायला मिळणार आहे. या पहिल्या वहिल्या हिंदी मालिकेसाठी अश्विनी महांगडे हिला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!!!…

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.