Breaking News
Home / मालिका / अभिनेते विजय कदम यांची पत्नीही आहे प्रसिद्ध कलाकार, अभिनेत्री पल्लवी जोशी सोबत आहे हे नाते
vijay kadam natak padmashree pallavi and alankar
vijay kadam natak padmashree pallavi and alankar

अभिनेते विजय कदम यांची पत्नीही आहे प्रसिद्ध कलाकार, अभिनेत्री पल्लवी जोशी सोबत आहे हे नाते

​​​”​ती परत आलीये​”​ ह्या मालिकेचा पहिला भाग ​​झी वाहिनीवर ​​काल प्रदर्शित ​​करण्यात आला. ​अगदी पहिल्या भागात​च​ मालिके​चे कथानक, व्यक्तिरेखा दिगदर्शन ​उत्तम असल्याचे प्रकर्षाने जाणवले. मालिकेतील मुख्य कलाकार विजय कदम ह्यांच्या अफलातून अभिनयामुळे ह्या मालिकेला ​प्रेक्षकांची ​विशेष​ पसंती मिळेल यात शंका नाही. ​​बऱ्याच वर्षांनी त्यांनी पुन्हा ​एकदा ​छोट्या पडद्यावर ​पदार्पण केले असले तरी त्यांची अभिनय शैली तेवढीच दांडगी वाटली. ​वयाच्या या टप्प्यातही त्यांच्या अभिनयात कसलीही​​ उणीव जाणव​त नाही​ हे विशेष​. ​त्याच प्रमाणे प्रमाणे ​अभिनेत्री कुंजीका काळवीट हिच्या अभिनयाची देखील ​रसिक प्रेक्षकांमध्येही चर्चा होताना पाहायला मिळ​त आहे​. अभिने​ते विजय कदम ह्यांच्या​ कारकीर्ती​बद्दल आज आपण ​थोडे ​जाणून घेणार आहोत…

vijay kadam great marathi actor
vijay kadam great marathi actor

अभिनेते विजय कदम आजवर अनेक चित्रपट आणि नाटकांत कामे केली आहेत. टोपी घाला रे बच्चे सबसे अच्छे,​ ​मधुचंद्राची रात्र, देखणी बायको नाम्याची, तोचि एक समर्थ अशा अनेक मराठी चित्रपटात काम करून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विजय कदम यांनी ​प्रसिद्ध ​चित्रपटा ​‘हळद रुसली कुंकू हसलं’ या ​मध्ये अभिनेत्री अश्विनी भावेच्या पतीची भूमिका साकारली. सही दे सही, टूर टूर, पप्पा सांगा कुणाचे ही त्यांची नाटके देखील तुफान गाजली. अनेकांना हे माहित नसेल ​की अभिनेते विजय कदम ह्यांनी प्रेम विवाह केला असून त्यांची पत्नी देखील मराठी अभिनेत्री आहेत. होय विजय कदम ह्यांच्या पत्नी पद्मश्री जोशी ह्या देखील ​प्रसिद्ध ​अभिनेत्री आहेत.​ ​नणंद भावजय, पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा या चित्रपटात पद्मश्री जोशी ह्यांनी अभिनय साकारला आहे.​ विजय कदम आणि पद्मश्री जोशी ह्यांनी ​भरपूर ​नाटकात एकत्रित कामे केली​, तेव्हाच विजय यांनी दोनदा ​मागणी घालूनही त्यांनी लग्नाला नकार दिला होता​,​ परंतु ​’विच्छा माझी पुरी करा​’ या नाटकातील विजय कदम यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे ​पद्मश्री स्वतःहून त्यांच्या प्रेमात पडल्या आणि आपला होकार कळ​विला. ​

pallavi vivek agnihotri and padmashri
pallavi vivek agnihotri and padmashri

सध्या पद्मश्री जोशी ह्या चित्रपट आणि नाटकांपासून थोड्या दूरच ​आहेत, ​परंतु ​काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या च्या ​मंचावर दोघांनी जोडीने हजेरी लाव​ली, हि रसिक चाहत्यांसाठी पर्वणीच होती. बऱ्याच कमी लोकांना हे माहित असेल कि विजय कदम ह्यांच्या पत्नी पद्मश्री जोशी आणि पल्लवी जोशी ह्या ​सख्ख्या बहिणी आहेत. तर ​प्रसिद्ध ​संगीत शिक्षिका सुषमा जोशी या यांच्या आई. सुष​​मा जोशी ह्यांना दोन मुली पद्मश्री, पल्लवी आणि एक मुलगा मास्टर अलंकार. मास्टर अलंकार हा देखील एक उत्तम अभिनेता आहे पण ​सध्या तो अभिनयापासून दूर ​असून स्वतःचा बिजनेस सांभाळत आहे. विजय चव्हाण ह्यांच्या पत्नीची बहीण ह्या नात्याने पल्लवी जोशी ह्या विजय कदम ह्यांच्या नात्याने मेव्हणी आहेत. ​सध्या पल्लवी आणि विवेक अग्निहोत्री यांनी एकत्रित समाजकार्यात ​स्वतःला वाहून घेतल्याचे सर्वश्रुत आहे. अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमठवणाऱ्या या सर्व दिग्ग्ज कलाकारांना मानाचा मुजरा. अभिनेते विजय कदम ​आणि ​ती परत आलीय ह्या मालिकेसाठी ​सर्व कलाकारांना कलाकार.इन्फो टीम तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा…

vijay kadam family friends photo
vijay kadam family friends photo

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.