इगतपुरी येथे २७ जून २०२१ रोजी दोन बंगल्यांमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण पोलिसांनी या पार्टीत सामील असलेल्या २७ जणांना ताब्यात घेतले होते. यातील २५ संशयितांना कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या संशयितांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. पियुष सेठिया याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इगतपुरी येथे ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. अभिनेत्री हिना पांचाळसह या पार्टीत दाक्षिणात्य फोटोग्राफर, कोरिओग्राफर, हिंदी चित्रपट अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. अभिनेत्री हिना पंचाळला काही दिवसांपूर्वीच जमीन मंजूर करण्यात आला होता.
त्यानंतर ती मुंबईतील आपल्या घरी पोहोचली आहे. हिनाने मिडीयाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, काही फॉर्मलीटीज पूर्ण करण्यासाठी मी नुकतीच नाशिक पोलीस स्टेशनला भेट देऊन आले. इगतपुरी येथे झालेल्या पार्टीमध्ये काय घडलं याबाबत मला फारसं बोलायचं नाही. एक सेलिब्रिटी म्हणून मला त्या पार्टीत आमंत्रित केले होते. मी आयुष्यात आजवर कधीही घेतले नाही उलट या पार्टीत माझा मोबाईल देखील हरवला आहे आणि नाशिकला असलेली माझी गाडी देखील अजून माझ्या ताब्यात दिली नसल्याचे हिनाने या मुलाखतीत सांगितले. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि लवकरच सत्य काय आहे ते सर्वांसमोर येईल. माझ्या आयुष्यात आलेल्या या कठीण प्रसंगी मराठी बिग बॉसच्या एकक कंटेस्टंटने माझी खूप मोठी मदत केली आहे. मराठी बिग बॉसच्या सिजन २ चा विजेता शिव ठाकरे हा माझ्या मदतीला धावून आला. जेव्हा मला अटक करण्यात आली त्यावेळी माझ्या घरच्यांना ही माहिती त्यानेच सांगितली होती. एवढेच नाही तर माझ्या साठी वकिलही त्यानेच शोधण्यास मदत केली. माझ्या अनुपस्थितीत शिवने माझ्या घरच्यांची खूप मोठी मदत केली त्यांना दुःखातून सावरण्याचा प्रयत्न केला. शिव ठाकरे माझ्या पाठीशी होता म्हणूनच आज मी जामिनावर सुटले आहे. माझ्यासोबत घडलेल्या या सर्व घटनेमागचे सत्य लवकरच बाहेर येईल असे हिना म्हणते.
हिना पांचाळने आजवर अनेक हिंदी मराठी चित्रपट साकारले आहेत. बहुतेकदा आयटम सॉंगसाठी तिला विचारले जाते. वंटास, शेंटिमेंटल, परफ्युम, माणूस एक माती, काय झालं कळंना, धुमस या मराठी चित्रपटात तिला काम करण्याची संधी मिळाली. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये ती कंटेस्टंट बनून आली होती. बिग बॉसच्या घरात असताना शिव ठाकरे आणि हिना पांचाळ यांची मैत्री झाली होती.