Breaking News
Home / जरा हटके / झी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण
mayra waykul
mayra waykul

झी मराठीवर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरेची एन्ट्री.. मालिकेतली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण

लवकरच झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला एकापाठोपाठ एक अशा तीन नव्या मालिका घेऊन येत आहे. वाघोबा प्रोडक्शन निर्मित “मन झालं बाजींद” या नव्या मालिकेसोबतच “ती परत आलीये” आणि “माझी तुझी रेशीमगाठ” या तीन नव्या दमाच्या मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्याच चर्चा रंगल्या आहेत. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे हे दोन्ही कलाकार “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्येही खूपच उत्सुकता पाहायला मिळत आहे.

cute myra vaikul
cute myra vaikul

त्यांच्यासोबत आणखी एक चिमुरडी झळकणार आहे ही चिमुरडी साऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आज या चिमुरडीबद्दल आपण जाणून घेऊयात… माझी तुझी रेशीमगाठ या नव्या मालिकेतून एक बालकलाकार झळकणार आहे तिचे नाव आहे “मायरा वायकुळ”. मायरा सध्या चार वर्षांची आहे आणि आजवर या वयात तिने बरेच काही साध्य केले आहे. टिक टॉक सारख्या व्हिडिओजच्या माध्यमातून मायरा वायकुळ हे नाव खूपच प्रसिद्ध झाले होते यातूनच तिला लोकप्रियता मिळत गेली. मायराचे व्हिडीओ युट्युब वरही प्रचंड लोकप्रिय आहेत. तिचे स्वतःचे युट्युबचॅनल देखील आहे. “Myra’s corner” या नावाने तिचे युट्युब चॅनल असून या चॅनलला जवळपास ८६ हजाराहून अधिक फॉलोअर्सनी सबस्क्राईब केले आहे. एवढ्या कमी वयात तिने मिळवलेली ही लोकप्रियता नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल.

world of myra family
world of myra family

आता मायरा झी मराठीच्या मालिकेत झळकणार आहे म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करून मायराला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या पहिल्याच मालिकेमुळे मायरा हिट होणार हे नक्की. माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आता कोणत्या मालिकेच्या जागी पाहायला मिळणार हे अजून गुलदस्त्यात असले तरी पुढच्या प्रोमोमध्ये त्याचा लवकरच उलगडा होईल. देवमाणूस, अग्गबाई सुनबाई आणि कारभारी लायभारी या तिन्ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. त्यांच्या जागी आलेल्या या नव्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होवोत हीच सदिच्छा आणि “मायरा वायकुळ ” या बालकलाकारालाही मालिकेनिमित्त मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन!!! …

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.