Breaking News

राजा राणीची गं जोडी मालिकेत नवा ट्विस्ट… रणजितच्या अंगावर चढणार वर्दी

ranjit uniform entry

कलर्स मराठी वाहिनीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेला आता मोठे वळण लागले आहे. मालिकेत रणजितच्या कारकीर्दीवर गालबोट लागले त्यामुळे त्याची वर्दी उतरवण्यात आली होती. त्यानंतर संजीवनीने स्वतः पीएसआय बनून शोध मोहीम सुरू केली. आता लवकरच रणजित ढाले पाटील यांची वर्दी पुन्हा एकदा त्याच मानाने त्याला मिळणार आहे. प्रेक्षक इतके …

Read More »

अभिनेता सुयश टिळकचा विवाह संपन्न… पहा लग्नाचे खास फोटो

suyash aayushi wedding photos

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे आज गुरुवार २१ ऑक्टोबर २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. नुकतेच त्यांच्या लग्नाचे खास फोटो अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आयुषी आता टिळक देशपांडे आणि खानविलकर कुटुंबाची सदस्य झाली असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. कारण हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे आणि …

Read More »

श्यामची आई चित्रपटातला बालकलाकार आज झाला ८२ वर्षांचा… पहा सध्या काय करतात…

shyamchi aai movie actors

छडी लागे छम छम विद्या येई… हे लोकप्रिय गीत आहे श्यामची आई या गाजलेल्या चित्रपटातलं. १९५३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री वनमाला, दामू अण्णा जोशी, सुमती गुप्ते, बाबुराव पेंढारकर अशा मातब्बर कलाकारांनी हा चित्रपट अभिनित केला होता. साने गुरुजींच्या श्यामची आई ह्या पुस्तकाचा आधार घेऊन आचार्य अत्रे यांनी …

Read More »

ऐतिहासिक मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा

sai kalyakar engagement

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका फेम अभिनेत्री सई कल्याणकर हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या प्रशांत शिवराम चव्हाण यांच्याशी तिने साखरपुडा केला आहे. डॉ प्रशांत चव्हाण यांनी नॅनो केमिस्ट्री विषयातून पीएचडी केली आहे. सई आणि प्रशांतच्या या साखरपुड्याला मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. सई कल्याणकर हिने महेश किठारे यांची …

Read More »

​​चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली पण बॉलिवूड करांमुळे मराठी चित्रपट अडचणीत

jayanti marathi movie release

फुले​ शाहू​ आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचे आजच्या समाजात काय महत्व आहे?​ ​​​या प्रश्नाचे उत्तर शोधणारा मराठी चित्रपट म्हणजे ‘जयंती’.​ ​मिलिओरिस्ट फिल्म्स स्टुडिओ निर्मित तसेच शैलेश नरवाडे दिग्दर्शित ॲक्शन, ड्रामा​ आणि नव्या धाटणीच्या विषयासह “जयंती लोकांचा हक्काचा सण” हा सिनेमा आपल्या हटके नावामुळे प्रदर्शना आधीच चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटात …

Read More »

अभिनेते मिलिंद शिंदे यांची मालिकेत कबड्डी प्रशिक्षक म्हणून दमदार एंट्री..

sukh mhnaje nakki kay asta milind shinde entry

घराचा आणि बिझनेसचा ताबा शालिनीने घशात घालण्याच्या खटाटोपात केल्याचे आत्तापर्यंतच्या भागात पाहायला मिळाले. सुडाने पेटलेली शालिनी संपूर्ण शिर्के कुटुंबाला तालावर नाचवत सर्व संपत्ती मिळवण्यासाठी जयदीपसोबत कबड्डीचा डाव आखला असल्याने मालिका खूपच रंजक वळणावर आली आहे. सर्व संपत्ती पुन्हा हवी असल्यास जयदीपला कबड्डीचा खेळ जिंकावा लागेल अशी अट शालिनीने ठेवली आहे. लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं …

Read More »

अभिनेत्री वर्षा दांदळे यांची अपघाताची बातमी समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल…

actress varsha dandale aacident

साधारण सात दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा भीषण अपघात झाल्याची बातमी पसरली होती. गंभीर अपघातामुळे त्यांच्या मणक्याला जबरदस्त दुखापत झाली, या खेरीज त्यांच्या उजव्या पायाला देखील भयंकर मार लागला होता. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर देखील मार लागल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली दिसत होती. पाठीला आणि पायाला दुखापत …

Read More »

गांजा ओढून दारू पिऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ.. दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर मीडियावर नाराज

sulochana didi mahesh tilekar

प्रसार माध्यमे चुकीच्या बातम्या देताना सर्रास पाहायला मिळते, काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिचा पती राजकुंद्राच्या प्रकरणात नावात असलेल्या साधर्म्यामुळे मराठी अभिनेता उमेश कामत यांचे नाव चर्चेत आले होते. बातमीतील सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर मीडियाने चूक झाली असल्याची कबुली दिली होती. बऱ्याच दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या फोटोवर टाकलेल्या चुकीच्या मजकुरावर …

Read More »

“तुझा इंस्टा आयडी नाही, अमरावतीला आलो की प्रपोज करेल…” शिव ठाकरे नक्की कोणाला म्हणतोय.. व्हिडीओ होतोय व्हायरल

shiv thakare proposes to

मराठी बिग बॉसच्या सिजन २ मध्ये शिव ठाकरेने पार्टीसिपेट केले होते, या दुसऱ्या सिजनचा तो विजेता ठरला होता. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये विजेतेपद पटकवण्या अगोदर शिव ठाकरे एम टीव्ही रोडीज या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये त्याने सेमिफायनल राउंड पर्यंत मजल मारली होती.रिऍलिटी शो मधून लोकप्रियता मिळवलेला शिव ठाकरे एका भन्नाट …

Read More »

“तू काय मेजरमेंट आणलंय का कॉन्फिडन्स मोजायचं” सोनालीचं मिराला सणसणीत उत्तर

sonali patil meera jagannath

बिगबॉस मराठी तिसऱ्या सिझनच्या रोजच्या घडामोडी खूपच रंजक होत चालल्या आहेत. दर आठवड्यात स्पर्धकांमध्ये विविध टास्कमधून दमदार परफॉर्मन्स देत असले तरीही घरातील कामाच्या वाटपावरून नेहमीच वादावादी होत आली आहे. सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यातील जोरदार भांडणानंतर आता सोनालीने मीराला सणसणीत उत्तरात धारेवर धरत चांगलीच फजिती केल्याचे मिम प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत.. घरातील कामांवरून अगोदर झालेल्या वादात तृप्ती देसाईने सोनालीला दम भरला होता पण सोनालीने लगेच …

Read More »