Breaking News
Home / मालिका / माझे या ग्रुपमध्ये येऊन फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झालंय.. मिनलच्या चुगलीवर विशाल विकासचे प्रतिउत्तर
vishhal nikam and meenal shah
vishhal nikam and meenal shah

माझे या ग्रुपमध्ये येऊन फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झालंय.. मिनलच्या चुगलीवर विशाल विकासचे प्रतिउत्तर

बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात झोंबिवली चित्रपटाची टीम दाखल झाली होती त्यावेळी उत्कर्ष, मीरा आणि विशाल यांच्यात तिकीट टू फिनाले साठी एक टास्क खेळण्यात आला होता. आपल्या मनात वेळ मोजून ३२ मिनिटांच्या जवळपास जो कोणी स्पर्धक घंटी वाजवेल त्याला फायनलमध्ये प्रवेश मिळणार होता. या टास्कमध्ये वेळ मोजत असताना बाकीचे सदस्य त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यातूनही आपले संतुलन ढळू न देता ३२ मिनिटांच्या जवळपास घंटी वाजवून विशालने हा टास्क जिंकला आणि पहिला फायनलिस्ट होण्याचा मान मिळवला.

vishhal nikam and meenal shah
vishhal nikam and meenal shah

आजच्या भागात उत्कर्ष, मीरा, सोनाली आणि विकास ह्या सदस्यांपैकी एकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागणार आहे. ह्या चारही जणांच्या बॅग आता बाहेर नेण्यात आल्या आहेत त्यातील कोणाची बॅग परत येणार नाही तो सदस्य ह्या आठवड्यात बाद होणार आहे त्यामुळे आज कोणता सदस्य घराबाहेर पडणार याची उत्सुकता आहे. आज विकास आणि विशालला मिनलबाबत एक चुगली समजते, मीनल म्हटली होती की माझे या ग्रुपमध्ये येऊन फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झालंय. मिनलच्या या चुगलीवर विशालने मिनलला म्हटलंय की आज आपण चौघेजण इथं बसलोय यापेक्षा मोठं उत्तर तुला सांगायची गरज नाही. माझ्या वागण्याच तू कौतुक केलंस ते खरं होतं की, त्यामागे तुझा काही हेतू होता. असे विकास म्हणतो, त्यामुळे मीनल आता बी टीम पासून हळूहळू आपला विश्वास गमावू लागली आहे का असा प्रश्न उभा राहतो. तूर्तास बिग बॉसच्या चावडीवर मिनलला महेश मांजरेकरांची बोलणी बसली होती.

chavadi mahesh manjrekar
chavadi mahesh manjrekar

सोनाली सोबत तिचा झालेला वाद काही केल्या मिटत नव्हता. गेली उडत असं मीनल सोनालीला म्हणाली होती त्यावेळी हा शब्द सोनालीला खूप खटकला होता, यावरून दोघींमध्ये वाद झाला होता. पण मीनल ते का बोलली याचे स्पष्टीकरण देत असतानाही आपलीच बाजू खरी असल्याचे सांगत होती. त्यामुळे महेश मांजरेकरांनी मिनलला खरे खोटे सुनावलेले पाहायला मिळाले. तू खूप ग्रेट आहेस असं तू समजतेस, तू इथं परफेक्ट आहेस का असं वाटतं तुला.. तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच तू दुसऱ्यांडून नेहमी कबूल करून घेतेस. असं म्हणून मांजरेकरांनी मिनलला झापले होते. त्यात आणखी एक बाब म्हणजे विकासला देखील सोनाली आणि मिनलच्या वादामुळे बोलणी खावी लागली. तू पेट्रोल टाकून भडका उठवण्याचा प्रयत्न केलास असं महेश मांजरेकर यांनी विकासला म्हटले. माझी चूक नसताना मलाच का बोलणी बसतात असे मीनल मांजरेकर यांच्याबाबत बोलली होती.

vikas patil vishhal nikam big boss
vikas patil vishhal nikam big boss

त्यामुळे त्यांनी घरातील सर्वच सदस्यांना माझं काही चुकतंय का? किंवा मी काय बोलावं असं तुम्ही मला सुचवू शकता. त्यावेळी घरातील सर्वच सदस्यांनी महेश मांजरेकर यांच्या सुत्रसंचालनाच कौतुक केलं. उलट तुमच्या बोलण्यामुळेच माझ्या वागण्यात खूप बदल झालाय अशी कबुली जयने दिली. आजच्या भागात कोणत्या सदस्यांची बॅग पुन्हा पुन्हा घरात परतणार आणि कोणाची बॅग घराबाहेरच जाणार हे कळेल. त्यानंतर बिग बॉसच्या घरात ६ स्पर्धक उरतील आणि पुढच्या आठवड्यात आणखी एक सदस्य एलिमीनेट होऊन ५ फायनलिस्ट मधून कोण बाजी मरेल हे निश्चित होईल.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.