Breaking News
Home / बॉलिवूड / जब मै यहाँ पर हूँ तो ढंग से बैठो.. सलमान खानने बिचुकलेंवर चढवला आवाज
abhijit bichukale salmankhan
abhijit bichukale salmankhan

जब मै यहाँ पर हूँ तो ढंग से बैठो.. सलमान खानने बिचुकलेंवर चढवला आवाज

हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनमध्ये अभिजित बुचुकले यांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. सुरुवातीला त्यांनी ह्या घरात आपला चांगला जम बसवला होता. तसेच सदस्यांसोबत त्यांची चांगली मैत्री देखील झाली होती. परंतु ह्या आठवड्यात देवोलीना आणि बिचुकले प्रकरण खूपच चर्चेत राहिल्याने त्यांना सलमान खानचा ओरडा खावा लागला आहे. देवोलीनाला ब्लॅकमेल करत गालावर किस मागितल्याने अभिजित बिचुकले वादात अडकले होते. ह्यावर सलमान खानने घरातील सदस्यांचे बिचुकलेबाबत मत विचारले, त्यावेळी रश्मी देसाई सह बऱ्याचशा सदस्यांनी बिचुकले यांचे वागणे योग्य नसल्याचे सांगितले.

abhijit bichukale salmankhan
abhijit bichukale salmankhan

यावर बिचुकले आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करतात.. भाई बोलू मै.. असे बिचुकले म्हटल्यावर, जितना बोलगा तू उतनाही फसेगा बिचुकले. असे म्हणत सलमान खान बिचुकलेना गप्प बसायला सांगतो. पण तरीही माझी ही खेळातली स्ट्रॅटजी आहे, असे बिचुकले म्हणतात. तेव्हा सलमान त्यांच्यावर आणखीनच भडकतो आणि पप्पी माँगना क्या येही आपकी स्ट्रॅटजी है. आप औरतों की डीस रिस्पेक्ट नहीं कर सकते. बिचुकले जब आपकी इस घर में सब लोग बजा रहे है, तो आप ऐसें आराम से नहीं रह सकते. ये यहाँ पर नहीं चलेगा. जब मै यहाँपर हुं तो ढंग से बैठो, असे सलमान बिचुकलेंना खडसावतो. दरम्यान देवोलीनाच्या प्रकरणामुळे बिचुकले बाथरूमजवळ जाऊन हेअर कलर शोधण्याचा प्रयत्न करतात.

kanika kapoor sunny leone salman khan
kanika kapoor sunny leone salman khan

तिथेच निशांत असतो त्याला देखील हेअर कलर शोधायला सांगतात. ह्या गोष्टींमुळे मला त्रास होतोय असं ते निशांतला म्हणतात, त्यावेळी निशांत त्यांच्यावर ओरडतो आणि घरातील सर्व सदस्यांना बिचुकले विष खाणार असल्याचे सांगतो. बिग बॉसच्या घरात उठलेलं हे वादळ आता कसे शांत होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. दरम्यान देवोलीना आपल्या मैत्रीवर खरी उतरली नाही. म्हणून तिला अभिजित बिचुकले यांनी जेलमध्ये टाकले होते. त्यावेळी मी मैत्रीच्या नात्यात कुठे चुकले, असे ती बिचुकलेना विचारते आणि रागात येऊन चपलेने मारेन असेही म्हणते. दरम्यान बिग बॉसच्या घरात सुपरस्टार गोविंदा, अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेत्री कनिका कपूर यांनी हजेरी लावली होती.

big boss hindi season 15 contestants
big boss hindi season 15 contestants

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.