Breaking News
Home / जरा हटके / अल्लू अर्जुनने साधला मराठीतून संवाद.. सोशल मीडियावर होतंय कौतुक
allu arjun marathi namaskar
allu arjun marathi namaskar

अल्लू अर्जुनने साधला मराठीतून संवाद.. सोशल मीडियावर होतंय कौतुक

‘पुष्पा द राईज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुनचा हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपटाच्या पहिल्या प्रोमोतुनच अल्लू अर्जुनने साकारलेला पुष्पाराज कसा असेल याचा अंदाज बांधला होता. त्यामुळे हा चित्रपट पाहून प्रेक्षकांची निराशा झाली नाही हीच या चित्रपटाची जमेची बाजू म्हणावी लागेल. अल्लू अर्जुनचा दमदार ऍक्शन सिन आणि डायलॉगबाजीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच  दिवशी प्रेक्षकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद चित्रपटाच्या कलाकारांना भारावून गेला आहे.

allu arjun marathi namaskar
allu arjun marathi namaskar

अल्लू अर्जुन , रश्मीका मंदाना आणि चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यात मीडियाने विचारलेल्या प्रश्नावर अल्लू अर्जुनने उत्तरं दिलेली पाहायला मिळाली. विशेष म्हणजे ही प्रेस कॉन्फरन्स मुंबईत घेतली असल्याने मराठी प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी अल्लू अर्जुनने मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ‘सज्जनहो माझे नमस्कार’ एवढं अल्लू अर्जुन बोलताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून अल्लू अर्जुनला भरभरून दाद दिली. सध्या सोशल मीडियावर त्याने साधलेला हा संवाद मोठी प्रसिद्धी मिळवताना दिसतोय. मराठी भाषेचा आपल्याला अभिमान बाळगायला हवा, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून आता व्यक्त केली जात आहे. यात आणखी एक खास बाब म्हणजे पुष्पा चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला अल्लू अर्जुनच्या भूमिकेसाठी श्रेयस तळपदेने आपला आवाज दिला आहे.

shreyash rashmika allu arjun pushpa
shreyash rashmika allu arjun pushpa

त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी ही अभिमानाची बाब ठरत आहे. अल्लू अर्जुनला दिलेला श्रेयस तळपदेचा आवाज सूट होईल की नाही अशी चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. कारण बहुतेक चित्रपटातून संकेत म्हात्रे या डबिंग आर्टिस्टने अल्लू अर्जुनच्या भूमिकेला आपला आवाज दिला आहे. याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या असल्या तरी श्रेयस तळपदेचा आवाज अल्लू अर्जुनच्या भूमिकेला चांगलाच सूट होत असल्याची प्रतिक्रिया आता अनेक प्रेक्षकांनी दिली आहे.  पुष्पा चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम पाहून कॉन्फरन्समध्ये अल्लू अर्जुनने तमाम प्रेक्षकांचे धन्यवाद मानले होते. त्यामुळे हा चित्रपट येत्या काही दिवसातच बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवणार अशी अपेक्षा आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.