Breaking News
Home / मालिका / आईला लव्ह यु म्हणत परीने सोडलं घर.. मालिकेत आला धक्कादायक ट्विस्ट
pari myra vaikul
pari myra vaikul

आईला लव्ह यु म्हणत परीने सोडलं घर.. मालिकेत आला धक्कादायक ट्विस्ट

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहाला एक मुलगी आहे हे आजोबांना माहीत नव्हते मात्र नुकताच यशने हा खुलासा केलेला पाहायला मिळाला. सिम्मी काकूने आजोबांची गोळी बदलल्यामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आजोबा सध्या अंथरुणाला खिळून असलेले दिसले. मात्र ते परीमुळेच अटॅक येऊन पडले असा समज आता यश नेहाने करून घेतला आहे. त्यामुळे परिबद्दल त्यांच्यासमोर कुठलाही विषय काढायचा नाही अशी काळजी ते घेत आहेत. यात नुकतेच बंडू काका आणि काकींनी येऊन आजोबांच्या तब्येतीची चौकशी केली. आणि तिथे काकांनी परिचा विषय काढला.

pari myra vaikul
pari myra vaikul

सिम्मीने आजोबांचा ऑक्सिजन बंद केला त्यामुळे आजोबांची प्रकृती अधिकच खालावली. काकांनीच परीचा विषय काढला म्हणून आजोबांना पुन्हा त्रास झाला हे यशला समजते तेव्हा यश काकांवर चिडतो. यशचे हे वागणे पाहून मात्र नेहा तिथून निघून जाते. इकडे परीला सोबत म्हणून समीर आणि शेफाली नेहाच्या घरी येतात. आजच्या भागात परीला आजोबांबाबत समजते आपल्या मुळेच यश आणि नेहाच्या लग्नाला आजोबा परवानगी देत नाहीत हे मीनाक्षी मामीकडून तिला समजते. हीच गोष्ट मनात धरून परी मात्र घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. परी आपली बॅग घेऊन आईला एक फोन करते ‘आय लव्ह यु आई’ एवढेच बोलून फोन कट करते. परी आज असे का बोलली असे म्हणून नेहा काळजीत असते.

myra prarthana and shreyas
myra prarthana and shreyas

मात्र परीने घर सोडण्याचा घेतलेला निर्णय हे ती काका काकूंना देखील सांगत नाही. आपल्यामुळे आईचे यशसोबत लग्न होत नाही हे लक्षात आल्यावर परी टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे. आणि ती घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. इकडे नेहा आणि यश यांनाही घरी काय घडले असेल याची कल्पना नसते. परी घर सोडून गेल्यावर मालिकेत अनेक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळणार आहे. ह्या चिमुकल्या परीची आता सगळीकडे शोधाशोध सुरू होणार आहे. या मध्ये मात्र यश परीला शोधून काढणार का? परी घर सोडून गेल्यावर तिच्यासमोर कोणकोणते संकट उभे राहणार आहेत? हे येत्या काही भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.