Breaking News
Home / मराठी तडका / सेटवर खूप त्रास देते, स्वतःच्या सूचना देते.. सोनाली कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीत आहे कशी?
gorgeous actress sonali kulkarni
gorgeous actress sonali kulkarni

सेटवर खूप त्रास देते, स्वतःच्या सूचना देते.. सोनाली कुलकर्णी मराठी इंडस्ट्रीत आहे कशी?

पांडू चित्रपटात सोनाली कुलकर्णीने उषाची भूमिका साकारली. खरं तर तिला ही भूमिका देणे विजू माने यांना सुरुवातीला खटकले होते. सोनालीबद्दल इंडस्ट्रीत काय ऐकायला मिळालं हे विजू माने यांनी एका पोस्टद्वारे सांगितलं आहे. त्यात ते म्हणतात की, ‘ठाण्यात एक इव्हेंट करत होतो.  इवेंट मध्ये ‘ती’ परफॉर्म करणार होती. तिच्या सोबत तिची आई सगळीकडे असायची. टिपिकल हीरोइन की मम्मी वाटायचं मला. मी इव्हेंट लिहीला आणि direct केला पण त्यावेळेला काही आमचं संभाषण होऊ शकलं नाही. पांडूच्या कास्टिंग बद्दल चर्चा सुरू असताना अचानक अश्विन पाटील ने तिचे नाव काढलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तिचं नाव येताक्षणी मी हंड्रेड पर्सेंट कन्व्हिन्स्ड नव्हतो. पण झी स्टुडीओज् चे सर्वेसर्वा मंगेश कुलकर्णी आणि अश्विन यांनी मला पटवून दिलं.

gorgeous actress sonali kulkarni
gorgeous actress sonali kulkarni

मी कन्व्हीन्स नसण्याचं कारण मला स्टार पदाला पोहोचलेल्या नट्यांचे नखरे आवडत नाहीत. सिनेमातल्या कॅरेक्टर पेक्षा यांच्या कॅरेक्टरवर अधिक बोललं जातं. सगळ्या पर्यायांमधून शेवटी एकदाचं तिचं कास्टिंग झालं, सिनेमा झाला, आणि ही पोरगी आपली एकदम झक्कास मैत्रीण झाली. सोनाली कुलकर्णी खरंच स्टारपद असलेल्या हीरोइन बद्दल बऱ्या वाईट चर्चा कायमच होत असतात. तो त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहे. पण मी सोनालीबद्दल का कोण जाणे थोडं वाईटच असं ऐकून होतो. सेटवर खूप त्रास देते, दिग्दर्शकाला स्वतःच्या सूचना देते. पहिला दिवस शूटिंगचा येईपर्यंत मला सतत असं वाटायचं, की माझ्या आणि तिच्यात सेटवर खटके उडणार. पण सेटवरच्या पहिल्या शॉट पासून ते प्रमोशन च्या शेवटच्या दिवसापर्यंत आमच्यात वादाचा असा मुद्दाच आला नाही. मुळात ती माझ्या अपेक्षेपेक्षा अत्यंत वेगळी होती. सेटवर कधीही एक सेकं देखील उशिरा पोहोचली नाही.

director viju mane and actress sonali kulkarni
director viju mane and actress sonali kulkarni

उलट दिलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे तरी आधी ती कुठेही हजर असते. मग ती मीटिंग असो, शिबिर असो, फोटोसेशन असो, डान्स असो, किंवा शूटिंग असो. आपण सेटवर असताना इतर कुठल्याही गप्पा न मारता, केवळ आपल्या सिनेमातील कॅरेक्टरबद्दल गप्पा मारायची. खरंतर, उषा कॅरेक्टरचे कॉश्च्युम डिझाइन करताना तिने खूप जास्त मेहनत घेतली आहे. उषाच्या नाकातल्या nose ring पासून, ते तिच्या साडीच्या पदराला असलेल्या गाठीपर्यंत तिने स्वतः विचारविनिमय करून बनवल्यात. प्रसंगी स्वतःचे कपडेदेखील तिने सिनेमात वापरले आहेत. शिवाय वजन कमी करून ती गाण्यात लाजवाब दिसली आहे. सिनेमासाठी passionately काम करणारी अभिनेत्री आहे ही. आणि जितकी सिनेमाच्या रोल बाबतीत गंभीर, तितकीच सेटवरच्या कुरापती मध्ये लबाड आणि खट्याळ. एखाद्याचा आपण पाणउतारा केलाय हे त्याला नकळता आजूबाजूच्यांना दाखवून देण्याची तिच्यात ‘विशेष’ कला आहे.

bhau kadam sonali kulkarni kushal badrike
bhau kadam sonali kulkarni kushal badrike

तिच्या आणखी एका गोष्टीचं फार अप्रूप वाटतं, ते म्हणजे प्रोफेशनलिझम. आपला हा सिनेमा सुरू असतानाच आपल्या वक्तशीर आणि ‘जेवढ्यास तेवढ्या’ वागण्याने अख्या युनिटच्या माणसांना आपलंसं करणे तिला करेक्ट जमतं. तिचे मार्केटिंग इतक्या सोप्या आणि बेमालूम पद्धतीने करते की पुढच्या सिनेमाचा विचार करताना एखादा दिग्दर्शक तिचा नक्कीच सगळ्यात आधी विचार करेल. पांडू सिनेमा आता सहाव्या आठवड्यात गेलाय. आणि आनंदाची म्हणा किंवा अभिमानाची म्हणा गोष्ट आहे की गेल्या आठवड्यातल्या ५०० शो वरून त्याची संख्या वाढून आता ८०० इतकी झाली आहे. या यशाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण ‘सोनाली कुलकर्णी’ सुद्धा आहे. थँक्यू सोनाली या प्रोजेक्टचा विशेष भाग झाल्याबद्दल. बाकी थोडा कुचकटपणा कमी केलास तर तू उत्तम माणूस आहेस’. असे म्हणत विजू माने यांनी प्रेक्षकांना पांडू चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.