काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी जय दुधानेला चांगलेच खडेबोल सुनावले. ह्या आठवड्यात जय संचालक असताना तो फेअर खेळला नाही. अ टीम विजयी व्हावी याच हेतूने तो मीरा आणि उत्कर्षला सल्ला देताना दिसला. संचालक ह्या पदाची व्याख्याच त्याने समजून घेतली नसल्याचा आरोप मांजरेकर यांनी त्याच्यावर लावला होता. त्यानंतर मीराला देखील महेश मांजरेकर यांनी चांगलंच धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी मीराला ११ मिनिटं मिळाली होती. त्यावेळी ती खूपच नाराज झाली होती.

गायत्रीसोबत झालेल्या वादामुळे तिने देऊ केलेला तिचा वेळ मिराने स्वीकारला नाही असे असले तरी मीरा सगळ्यांवर ओरडताना दिसली. मिराचे हे वागणे महेश मांजरेकर यांना देखील रुचले नाही . पुस्तक निवडीच्या टास्कमध्ये देखील तिने स्वतःच्याच नावाचे पुस्तक उचलले त्यानंतर तिने ते सोडून दिले मात्र यादरम्यान विशालने पुस्तक खेचून घेतले तेव्हा तिच्या हाताला लागलं असल्याचा आव आणला. ह्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक घडामोडी घडल्या त्यात विशाल आणि सोनालीमध्ये वाद झालेले पाहायला मिळाले होते मात्र जेव्हा ह्या सदस्यांच्या घरच्यानी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली तेव्हा सगळा आरडाओरडा बंद झालेला पाहायला मिळाला. विशाल लहानपणापासूनच आपल्या आई वडिलांना वर्षातून एकदाच भेटतो त्यामुळे आपल्या आईला बिग बॉसच्या घरात पाहून तो खूपच भावुक झाला होता आणि त्याचे डोळे पाणावले देखील होते. ह्याच गोष्टीवरून सोनाली विकास सोबत बोलत होती. ‘ये कुछ ज्यादा नहीं हुवा’.. या सोनालीच्या म्हणण्याचे मांजरेकरांनी स्पष्टीकरण मागितले त्यावेळी माझ्या म्हणण्याचा उद्देश हा नव्हता असे तिने सांगितले.

मात्र सोनालीच्या ह्या वागण्यावरून विशालला मात्र खूपच गहिवरून आलेलं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मी माझ्या घरच्यांना वर्षातून एकदाच भेटतो तेव्हा असाच भावनिक होतो असे म्हणत त्याचा कंठ दाटून आलेला दिसला. आजच्या भागात ज्या सदस्यांनी कुणाला मदत केलीये हे ते विसलेत त्यांना टॅग करायचं आहे. त्यावेळी विशाल आपल्या पाठीवर सोनालीचा भार आहे असा टॅग लावतो. तो त्याचं स्पष्टीकरण देतो त्यावेळी सोनाली म्हणते की मी तुझ्यावर कधी भार नव्हते. त्यावेळी विशाल म्हणतो की मी एक चांगल्या पद्धतीने करायला बघतोय पण तू वाकड्यात जातेस ती तुझी सवय आहे, असं म्हणून या दोघात आता आणखीनच वाद वाढताना दिसत आहेत. दरम्यान विशाल आणि सोनाली एकमेकांसोबत बोलण्याचं देखील टाळत आहेत. यांच्यात पॅचअप व्हावे म्हणून मांजरेकरांनी देखील प्रयत्न केले आहेत.