आपण जिथे काम करतो तिथे आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मराठी सेलिब्रिटी देखील अभिनय क्षेत्रात यश मिळाल्यानंतर स्थिरस्थावर होण्यावर लक्ष केंद्रित करत असतात. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी हिने स्वतःचं फार्महाऊस खरेदी केलं. तर सई लोकूर हिनेही लग्नानंतर स्वतःचं हक्काचं घर खरेदी करत नव्या घरात गृहप्रवेश केला. …
Read More »खास मैत्रिणींमध्ये जुंपलं भांडण.. राजश्री मोरेने ओशिवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली दाखल
राखी सावंतचा नवरा आदिल दुराणी जसा जेलच्या बाहेर आला तसे त्याने राखीच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. २१ ऑगस्ट रोजी आदिल दुराणी तब्बल सहा महिन्यानंतर जेलच्या बाहेर आला होता. आपल्यावर झालेले आरोप खोदून काढण्यासाठी त्याने प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती. या प्रेस कॉन्फरन्समध्ये राखीनेच आपल्याला मारहाण केली आणि माझ्याकडूनच तिने गाडी, …
Read More »हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो मात्र.. केदार शिंदेने व्यक्त केली खंत
मराठी रिऍलिटी शोमध्ये मराठी चित्रपटांच्या जोडीला आता हिंदी चित्रपटांचेही प्रमोशन केले जाते. चला हवा येऊ द्या शो मध्ये नुकतेच सय्यमी खेर आणि अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली होती. घुमर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही कलाकार मंडळी मराठी प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यासाठी अशा शोला हजेरी लावतात. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्येही अभिनेत्री …
Read More »दत्तक पुत्र आहेत नागराज मंजुळे.. नावामागची ही कहाणी आहे खास
सैराट चित्रपटामुळे नागराज मंजुळे यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाअगोदर त्यांनी पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री सारखा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवला होता. या दोन्ही कलाकृतींचे मोठे कौतुक झाले होते. झुंड, घर बंदूक बिरयानी या चित्रपटानंतर त्यांनी खाशाबा या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. खाशाबा चित्रपटासाठी ऑडिशन घेतल्या जात आहेत, …
Read More »आगरी कोळी माणूस प्रत्येकवेळी अडाणी, बेवडा दाखवणे बंद करा.. आगरी कोळी बांधवांचा कलासृष्टीला थेट इशारा
चित्रपट मालिकांमधून आक्षेपार्ह विधानं केली जातात. ज्यातून लोकांच्या भावना दुखावल्या जात असतील तर लगेचच त्याला विरोध केला जातो. चला हवा येऊ द्या किंवा महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोला कायमच बंधनं लादलेली पाहायला मिळतात. विनोद निर्मिती करताना चुकून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या तर कलाकारांना वेळीच समज देण्यात येते. प्रसिद्ध कलाकार भाऊ कदम असो किंवा समीर …
Read More »त्या एका सिननंतर पुढचे सहा दिवस मी कमल हसनच्या टेबलवर जेवायला होतो.. शरद पोंक्षे यांच्या नथुराम गोडसेच्या भूमिकेचा किस्सा
अभिनेते शरद पोंक्षे हे गेली अनेक वर्षे मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक करत होते. या नाटकाला अनेक विरोध झाले. या भूमिकेमुळे वेळप्रसंगी लोक शरद पोंक्षे यांना स्टेजवरच मारायला धावायचे. त्यांना जीवे मारण्याच्याही धमक्या दिल्या जायच्या. पण शरद पोंक्षे जराही डगमगायचे नाहीत. याच नाटकामुळे त्यांना हे राम चित्रपट साकारण्याची संधी …
Read More »घाऱ्या डोळ्यांची बालकलाकार झळकणार नव्या मराठी मालिकेत.. हिंदी सृष्टीत केलंय काम
सन मराठी वाहिनीने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजवर सुंदरी, संत गजानन शेगावीचे, प्रेमास रंग यावे, क्षेत्रपाल श्री वेतोबा अशा कौटुंबिक तसेच अध्यात्मिक धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता लवकरच या वाहिनीवर सावली होईन सुखाची ही आगळीवेगळी मालिका प्रसारित केली जाणार आहे. या …
Read More »त्या चित्रपटावेळी माझ्यावर ९० लाखांचं कर्ज होतं.. त्यानंतरचे चित्रपट आपटले आणि मी
बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे केदार शिंदे यांना दिग्दर्शक म्हणून घवघवीत यश मिळाले. या चित्रपटासाठी केदारला कोणीही फायनान्स करायला पुढे येत नव्हता. मात्र जिओने त्यांच्यावर विश्वास दाखवला. आणि बॉक्सऑफिसवर चित्रपटाने कमाल घडवत करोडोंची कमाई केली. सिने क्षेत्रात यश अपयश अशा दोन्ही गोष्टी पचवाव्या लागतात. कधीकाळी केदार शिंदे वर ९० लाखांचे …
Read More »गश्मीर महाजनीच्या मुलाचं नाव आहे खूपच खास.. दोन अक्षरी नावाने वेधलं लक्ष
रविंद्र महाजनी यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा गश्मीरने सुद्धा अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. गश्मीरने घेतलेल्या मेहनतीचे यश त्याला मिळत गेले. अगदी मराठी चित्रपट सृष्टीचा नायक ते हिंदी चित्रपट मालिकेचा नायक अशी त्याने मजल मारलेली पाहायला मिळाली. मी स्मार्ट आहे पण वडीलांसारखा देखणा नाही असे तो एका मुलाखतीत म्हणाला होता. …
Read More »त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळली.. परदेशात गेलेल्या कलाकारांचा अविस्मरणीय अनुभव
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेलं आहे. सध्या या शोने टीव्ही क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. मात्र असे असले तरी ही सर्व कलाकार मंडळी सध्या परदेश दौऱ्यावर गेली आहेत. गौरव मोरे, दत्तू मोरे, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप सह हे कलाकार उत्तर अमिरेकीत …
Read More »