Breaking News
Home / बॉलिवूड / खास मैत्रिणींमध्ये जुंपलं भांडण.. राजश्री मोरेने ओशिवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली दाखल
rajshree more rakhi sawant
rajshree more rakhi sawant

खास मैत्रिणींमध्ये जुंपलं भांडण.. राजश्री मोरेने ओशिवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली दाखल

राखी सावंतचा नवरा आदिल दुराणी जसा जेलच्या बाहेर आला तसे त्याने राखीच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. २१ ऑगस्ट रोजी आदिल दुराणी तब्बल सहा महिन्यानंतर जेलच्या बाहेर आला होता. आपल्यावर झालेले आरोप खोदून काढण्यासाठी त्याने प्रेस कॉन्फरन्स बोलावली होती. या प्रेस कॉन्फरन्समध्ये राखीनेच आपल्याला मारहाण केली आणि माझ्याकडूनच तिने गाडी, दुबईत घर खरेदी करण्यासाठी पैसे घेतले होते याचे पुरावे मीडियाला दिले. राखी सावंत हिने रितेश सिंग सोबत लग्न केले होते, ती सिंगल नाही याचेही पुरावे आदिलने या कॉन्फरन्समध्ये दिले.

rakhi sawant adil
rakhi sawant adil

राखी रितेशला भेटत होती मला फसवून ती त्याच्यासोबत फिरायला गेली होती असेही आदिल यावेळी म्हणाला. याशिवाय दुबईत स्वतःची डान्स अकॅडमी सुरू करण्यासाठी तिने माझ्याकडूनच पैसे घेतले आणि ती कल्पना माझी होती. मी जसा जेलमध्ये गेलो तसे ती अकॅडमी बंद पडली. राखीला अकॅडमी कशी चालवायची हेच माहिती नाही, तिला फक्त पैसे घ्यायला येतात आणि लोकांना फसवायला येतं असे आदिल म्हणतो. मी हे सगळं मिडियासमोर बोलणार होतो म्हणूनच राखीने माझ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आदिलच्या या स्पष्टीकरणानंतर राखी सावंत हिनेही एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये राखीने आदिलने लावलेले सर्व आरोप धुडकावून लावले आहेत.

adil rakhi rajshree
adil rakhi rajshree

आदिल विरोधात मी पोलिसांना पुरावे दिले म्हणूनच तो जेलमध्ये त्याची शिक्षा भोगत होता असेही तिने म्हटले.मात्र आता आदिलनंतर राखीची खास मैत्रीण राजश्री मोरे हिनेच राखीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राखीने धमकी दिली असल्याने राजश्रीने ओशिवाडा पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. साधारण एक महिन्यांपूर्वी दुबईमध्ये राजश्री आणि राखी मध्ये जोरदार भांडण झालं होतं. मिडियाने हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र आता राखीच्या कृत्यामुळे आता आमच्यात पुन्हा कधीच मैत्री होणार नाही असा निर्णय राजश्रीने एका मुलाखतीत दिला आहे. राजश्री या मुलाखतीत म्हणते की, मी राखिला मैत्रीण मानत होते. तिच्या जेवणाचा खर्च, शॉपिंगचा खर्च सुद्धा मी करत होते.

rajshree more friend rakhi
rajshree more friend rakhi

एवढंच नाही तर तिच्या प्रत्येक संकटात मी तिला वेळोवेळी मदत केली होती. तिच्या आईला बरं वाटावं म्हणून मी अनाथालयात मुलांसाठी खाऊ घेऊन गेले होते. राखीने त्या मुलांना जे ५०० रुपये दिले होते तेही माझेच होते पण या सगळ्या गोष्टी मी कधीच उघड केल्या नाहीत. कारण मी तिच्याशी मैत्री केली होती. पण या मैत्रिणीनेच माझा विश्वास तोडला आहे. मी राखीसोबत दुबईत गेले तिथे तिने मेकअप करणाऱ्यांना पैसे मागण्यास सांगितले. मी ते केलं नाही याचा राग म्हणून राखी माझ्या विरोधात जे नाही ते बोलू लागली. माझी बदनामी करण्यास सुरुवात केली. आता तर आदिल जेलमधून बाहेर पडला आहे त्यामुळे ती मला धमक्या देऊ लागली आहे. तू आता आदिलला सामील होशील अशी ती मला फोनवर धमकी देत आहे.

आदिल आणि तूम्ही दोघेही एकत्र येऊन माझं काही बिघडवू शकणार नाही असेही ती म्हणते. राखी गटार आहे, त्या गटाराचं झाकण काढलं की घाण वासच येणार दुसरं काही नाही. मी बोलायला सुरुवात केली तर राखीचं सगळं गुपित मी बाहेर काढेन. आता माझी तिच्याशी पुन्हा कधीच मैत्री होऊ शकत नाही असे राजश्री या मुलाखतीत म्हणते. दरम्यान राजश्री मोरे ही राखीची बेस्ट फ्रेंड म्हणून सर्वांच्या परिचयाची झाली होती. नेल आर्टस् स्टुडिओ या नावाने तिचा मुंबईत मोठा बिजनेस आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.