आज २६ मार्च २०२३ रोजी झी मराठी वाहिनीवर चित्रगौरव पुरस्कार सोहळा प्रसारित होत आहे. या सोहळ्याची झलक प्रमोमधून प्रेक्षकांना पाहायला मिळत होती. आजचा हा सोहळा सर्वार्थाने रंगतदार होणार आहे. सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या मंचावर हृदयी वसंत फुलताना गाण्यावर नृत्य सादर करताना दिसणार आहेत. कित्येक वर्षानंतर त्यांना या गाण्यावर पुन्हा एकदा थिरकताना मजा वाटणार आहे. सोबतच श्रेयस तळपदे याचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. बॉलिवूड दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना चंद्रा गाण्यावर नृत्य सादर करत आहे. शोमध्ये आणखी एक असा सोनेरी क्षण आहे जो पहायला प्रेक्षक खूपच आतुर झाले आहेत.

हा सोनेरी क्षण म्हणजेच आपल्या लाडक्या महानायकला दिला जाणारा सन्मान. अभिनयाचे महानायक अशोक सराफ सराफ यांना झी चित्र गौरव सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. सिद्धार्थ जाधव अशोक सराफ यांच्या गाण्यांवर थिरकणार आहे, सोबतच त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहे. आपलं सादरीकरण झाल्यानंतर सिद्धार्थ भावुक होतो आणि अशोक सराफ यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पाया पडतो. त्यावेळी अशोक सराफ खूपच भावुक होतात. हे पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी येतं. आपल्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालंय, हे प्रेम पाहून वाटतं दरवेळी आपण नट म्हणूनच जन्माला यावं अशी प्रतिक्रिया अशोक सराफ देतात. हा क्षण आज टीव्हीवर पाहण्यासाठी तमाम प्रेक्षक आसुसलेले आहेत.

पुरस्कार स्वीकारताना निवेदिता सराफ त्या ठिकाणी काही खाजगी कारणास्तव हजर नव्हत्या. मात्र सोशल मीडियावरून निवेदिता सराफ यांनी याबद्दल प्रथमच एक प्रतिक्रिया दिली आहे. ह्या सोहळ्याचा क्षण शेअर करताना निवेदिता सराफ भारावून गेल्या आहेत. याबद्दल त्या म्हणतात की, मी झी मराठीची खूप ऋणी आहे. अशोकला लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देताना इतका अविस्मरणीय सोहळा केल्याबद्दल. अशोक सराफ यांचा सन्मान होत असताना निवेदिता सराफ का हजर राहू शकल्या नाही याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्या मालिकेतूनही काढता पाय घेणार असे बोलले जात होते. मात्र असे असले तरी त्यांची याबद्दल प्रतिक्रिया मिळणे अपेक्षित होते. म्हणूनच त्यांच्या प्रतिक्रियेची सर्वचजण वाट पाहत होते. आज हा सन्मान सोहळा पाहण्यासाठी निवेदिता सराफ यादेखील उत्सुक असल्याचे दिसून येते.