Breaking News
Home / मराठी तडका / स्वतःचे फोटो टाकत राहा नाहीतर हरवून जाण्याची भीती दाखवली जाते.. मराठी बिग बॉसच्या अभिनेत्रीची खंत

स्वतःचे फोटो टाकत राहा नाहीतर हरवून जाण्याची भीती दाखवली जाते.. मराठी बिग बॉसच्या अभिनेत्रीची खंत

सोशल मीडिया असे माध्यम आहे ज्यातून तुम्ही सतत चाहत्यांच्या संपर्कात राहू शकता. सतत फोटो आणि रील करताना तुम्ही चर्चेत राहिले जाता. यातूनच कामं मिळत राहतात असा एक गोड गैरसमज कलासृष्टीत रुळला आहे. त्याचमुळे अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाशी जोडली गेली आहेत. मात्र एक काळ असा होता जिथे या सोयी सुविधांच्या शिवायही कामे मिळवली जात होती. अभिनय उत्तम असेल तर काम नक्की मिळते या मतावर आजही अनेकजण ठाम आहेत. त्याचमुळे अनेक कलाकार मंडळी अशा माध्यमांशी अजूनही जोडली गेलेली नाहीत. पण कलाकारांचे वाढते प्रमाण आणि मिळणाऱ्या संधी देखील खूप मोठ्या असल्याने हे माध्यम अतिशय उपयुक्त ठरले आहे.

yashashri masurkar tuktukrani
yashashri masurkar tuktukrani

आजची कलाकारांची पिढी त्यामुळे सतत रीलच्या माध्यमातून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. पण या आभासी दुनियेमुळे आपण निसर्गाच्या निस्सीम सौंदर्यापासून दूर जात आहोत असे मराठी बिग बॉस फेम यशश्री मासुरकर हिला वाटत आहे. यशश्रीने नुकत्याच झालेल्या मराठी बिग बॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये सहभाग दर्शवला होता. या शोमुळे यशश्री चांगलीच चर्चेत राहिली होती. मात्र जशी ती शोमधून बाहेर पडली तसा तिच्याकडे कुठलाही नवीन प्रोजेक्ट चालून आला नाही. दरम्यान या सीजनचे बरेचसे सेलिब्रिटी एकमेकांना भेटताना पाहायला मिळाले. मात्र यशश्री कोणाच्याही संपर्कात दिसली नाही. यशश्री ही स्वच्छंदी मुलगी आहे. तिला आपलं जीवन मनमोकळेपणाने जगायला आवडतं. काम मिळवण्यासाठी तुम्हाला सतत आपले फोटो शेअर करावे लागतात.

yashashri masurkar big boss
yashashri masurkar big boss

मात्र या आभासी दुनियेपासून वेगळे होऊन कधीतरी निसर्गाच्याही सानिध्यात जगा असे तिने म्हटले आहे. आपण कुठेतरी हरवून जात आहोत अशी भीती तिने व्यक्त केली आहे. मी अशी मुलगी मुळीच नाही असे म्हणत ती म्हणते की, बरेच दिवस झाले फक्त स्वत:चे फोटोज टाकतेय. खरं तर ही काळाची गरज बनली आहे. स्वतःला सतत पुढे करत राहणं म्हणजे स्वतःचीच टिम्ब टिम्ब करत राहणं गरजेचं आहे. नाहीतर गर्दीत कुठेतरी हरवून जाल अशी भीती दाखवली जाते. काही अंशी तसं घडतही, मग गरज नसताना उगाचच दिसत रहा, चर्चेत रहा. मला हे फारसं जमत नाही. पण आपण कधी ह्या चक्रात अडकून जातो ते कळतही नाही म्हणून अधुन मधून स्वतःतून निघून आसपास बघणं गरजेचं आहे. आणि ते तेव्हाच घडतं जेव्हा आतल्या गोंधळाला शांत करता येतं!

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.