Breaking News
Home / जरा हटके / पोट खूप सुटलंय.. ट्रोलिंगवर अभिज्ञा भावेचं सडेतोड उत्तर
abhidnya bhave mehul birthday
abhidnya bhave mehul birthday

पोट खूप सुटलंय.. ट्रोलिंगवर अभिज्ञा भावेचं सडेतोड उत्तर

मराठी मालिका सृष्टीत नायक नायिके इतकीच खलनायिकेची भूमिकाही तेवढीच महत्वाची असते. अशा भूमिकेतून वावरणाऱ्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागत असते. अभिनेत्री अभिज्ञा भावे हिला देखील या गोष्टी चुकलेल्या नाहीत. नुकतेच अभिज्ञाच्या नवऱ्याचा म्हणजेच मेहुल पै याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा अभिज्ञाने त्याच्यासाठी खास सरप्राईज पार्टी अरेंज केली होती. अभिनेत्री रेश्मा शिंदे सह काही जवळचे मित्र मंडळी मेहुलच्या वाढदिवसाला हजर होते. मेहुलच्या वाढदिवसाचे काही खास क्षण अभिज्ञाने सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळाले.

abhidnya bhave mehul birthday
abhidnya bhave mehul birthday

मेहुलला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. एका फोटोवरून युजरने अभिज्ञाला तू प्रेग्नंट आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर अभिज्ञाने प्रतिक्रिया देण्याचे टाळलेले पाहायला मिळाले. मात्र एका युजरने तर ‘पोट खूप सुटलंय, नाही जमले’ अशी थेट टिकाच केलेली पाहायला मिळाली. या टीकेला मात्र अभिज्ञाने सडेतोड उत्तर देताना म्हटले आहे की, ‘हो आणि त्याबरोबर माझं करिअर पण सुटलंय! पण तुमचं तर फक्त पोटच सुटलेलं दिसतंय, माझ्या करिअर कडणं इन्स्पिरेशन घेतलत तर तुमच्या पोटाकडे लोकांचे लक्ष जाणार नाही.’ अभिज्ञाच्या या सडेतोड उत्तरावर आता तिच्यामध्ये तिने साकारलेल्या वल्लीचं कॅरॅक्टर रक्तात शिरलंय अशी मजेशीर प्रतिक्रिया चाहत्याने व्यक्त केली आहे.

valli tu tevha tashi
valli tu tevha tashi

कलाकारांना प्रेक्षकांच्या टीकेचा नेहमीच सामना करावा लागतो. त्यामुळे कोणत्या टीकेला उत्तर द्यायचे आणि कोणत्या टीकेला दुर्लक्ष करायचे हे तो कलाकार विचारपूर्वक ठरवत असतो. अर्थात यामुळे त्या कलाकाराला मात्र एक वेगळीच प्रसिद्धी मिळत असते. या प्रसिद्धीचा फायदा त्यांना नवीन प्रोजेक्ट मिळवण्यासाठी निश्चितच होत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी श्वेता खरात आणि मिताली मयेकर यांनाही अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र श्वेता आणि मिताली या दोघींनीही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळालं होतं. मितालीने बिकिनी वरील फोटोत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं कि, आज मी सकाळी उठून कॉन्ट्रोव्हर्सी निवडली आहे. कमेंट मधून मला आपल्या संस्कृती विषयी ज्ञान देऊ नका, तुम्हाला स्वतःचीच लाज वाटेल. अशा पुणेरी शैलीत समाचार घेतला होता.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.