Breaking News
Home / मालिका / आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. यश करणार आत्महत्येचा प्रयत्न
yash aai
yash aai

आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक ट्विस्ट.. यश करणार आत्महत्येचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वीच आई कुठे काय करते या मालिकेत विणाची एन्ट्री झाली. अनिरुद्ध आणि वीणा यांची वाढलेली जवळीक पाऊण अरुंधती आणि संजना तिला वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न करत आहेत. संजनाला रस्त्यावर उभे राहिलेले पाहून अनिरुद्ध तिची विचारपूस करतो. हे पाहून  वीणाला त्यांच्यातील बॉंडिंग खूप छान असल्याचा भास होतो. पण अनिरुद्धच्या गोड बोलण्याला फसू नकोस अशी कानउघडणी संजना करताना दिसते. त्यामुळे अनिरुद्धचा डाव वीणा ओळखणार की त्याच्या जाळ्यात अडकणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास या मालिकेत आजच्या भागात प्रेक्षकांना धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

yash aai
yash aai

यश गेल्या काही दिवसांपासून खूपच एकाकी राहू लागला आहे. गौरीच्या विरहात तो डिप्रेशन मध्ये जाऊन स्वतःच्या विचारांत गुंतलेला आहे. ईशाच्या साखरपुड्यावेळी यशला पॅनिक अटॅक येऊन गेला होता. त्यामुळे सगळेचजण त्याची खूप काळजी घेत होते. मात्र आता यश एक चुकीचे पाऊल उचलताना दिसणार आहे. आशुतोष सोबत फोनवर बोलताना यशला खूप अस्वस्थ जाणवत होतं. त्यामुळे आशुतोष यशला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो. यशला नक्कीच काहीतरी होतंय याची कुणकुण आशुतोषला लागली होती. मात्र तो चुकीचं काही पाऊल टाकले याचा विचारच त्याने केलेला नव्हता, त्यामुळे आशुतोष निर्धास्त राहिला. पण इकडे यश कुठेच दिसत नसल्याने आणि त्याचा मोबाईल देखील बंद असल्याने ईशाला त्याची खूप काळजी वाटत होती.

yash gauri aai kuthe kay karte
yash gauri aai kuthe kay karte

ईशा थेट आशुतोषकडे येते. यश घरी नाही, तो त्याच्या स्टुडिओत सुद्धा नाही आणि त्याचा फोन सुद्धा बंद आहे म्हणून सगळे जण काळजी व्यक्त करतात. तेवढ्यात यशचा अपघात झाल्याची बातमी हॉस्पिटलकडून येते तेव्हा सर्वजण तिकडे धाव घेतात. या अपघातात यशच्या डोक्याला दुखापत झालेली दाखवली आहे. त्यामुळे सगळेजण यशची करतात. यशने आत्महत्येचा प्रयत्न केला हे अरुंधतीला अजून तरी समजलेले नाही. मात्र ही गोष्ट तिला समजल्यावर अरुंधती कोणता निर्णय घेणार याकडे प्रेक्षक लक्ष देऊन आहेत. मालिकेतला हा ट्विस्ट यशचे आयुष्य बदलून जाणार असे वाटते. यश आणखी कोणते चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून अरुंधती आता कुठला निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.