Breaking News
Home / मालिका / शेफाली आणि समीरचा साखरपुडा सजला..
sameer shefali engagement
sameer shefali engagement

शेफाली आणि समीरचा साखरपुडा सजला..

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशला अविनाशचं सत्य लवकरच समजणार आहे. परीचे डॉक्युमेंटस घेण्यासाठी नेहा आपल्या चाळीतल्या घरी गेलेली असते तिथेच यश अविनाशला सोबत घेऊन आलेला असतो. बंडू काका काही बोलू नयेत म्हणून काकू त्यांना रमाची शपथ घालतात. मात्र नेहा कागदपत्र घेऊन येते त्यावेळी परीच्या जन्माचा दाखला खाली पडतो. त्यावर परीच्या वडिलांचे नाव अविनाश असल्याचे त्याला समजते. त्यामुळे यशला आता अविनाशचं सत्य समजणार असल्याने मालिकेला धक्कादायक वळण मिळणार आहे. परंतु ह्या ट्रॅक नंतर रंजक घडामोडींमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच होणार आहे.

sameer shefali engagement
sameer shefali engagement

काही दिवसांपूर्वीच मालिकेत नेहा आणि यशच्या लग्नाचा सोहळा पाहायला मिळाला. त्यानंतर समीर आणि शेफालीने देखील लवकरच लग्न करावे अशी चाहत्यांची देखील ईच्छा होती. यश नेहाच्या जोडीला प्रेक्षकांनी जसे प्रेम दिले तसेच प्रेम याही जोडीवर दिलेले पाहायला मिळाले. यशचा खास मित्र अशी समीरची ओळख असली तरी, संकर्षण कऱ्हाडेने साकारलेल्या या पात्रामुळे मालिकेला एक वेगळा रंग चढलेला पाहायला मिळाला. मध्यंतरी संकर्षण नाटकाच्या दौऱ्यामध्ये असल्याने तो ही मालिका सोडणार असे बोलले जात होते. मात्र संकर्षणचे मालिका सोडून जाणे हे प्रेक्षकांना मुळीच रुचले नसते. अर्थात समीरचे आणि शेफालीचे असणे ही या मालिकेची खरी गरज होती.

sameer yash avinash
sameer yash avinash

यश आणि नेहाच्या प्रेमात आणि वादात जर त्यांना कोणी मदत केली असेल ती त्यांच्या या जिवलग मित्रांनी. आणि म्हणूनच त्यांचा लग्नाचा सोहळा देखील प्रमुख भूमिकां ईतकाच महत्वाचा मानावा लागेल. लवकरच मालिकेत शेफाली आणि समीरच्या साखरपुड्याचा सोहळा सजलेला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मालिकेत रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळणार आहेत. शेफाली आणि समीरच्या साखरपुड्याची जय्यत तयारी झाली असून परी देखील नटूनथटून या सोहळ्यात हजेरी लावणार आहे. यश आणि नेहाच्या पुढाकाराने आलेला हा रंजक ट्रॅक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल याची खात्री आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.