Breaking News
Home / मालिका / स्वप्नीलला अजूनही वडिलांकडून मिळतो पॉकेटमनी.. महिन्याच्या अगोदरच पैसे संपले तर द्यावं लागतं स्पष्टीकरण
swapnil joshi with family
swapnil joshi with family

स्वप्नीलला अजूनही वडिलांकडून मिळतो पॉकेटमनी.. महिन्याच्या अगोदरच पैसे संपले तर द्यावं लागतं स्पष्टीकरण

मराठी सृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आता छोट्या पडद्यावरून झळकताना दिसत आहेत. श्रेयस तळपदे, उमेश कामत यांच्या पाठोपाठ स्वप्नील जोशीने देखील मालिका सृष्टीत पुनरागमन केलं आहे. श्रेयस आणि स्वप्नील हे मराठी सृष्टीत छोट्या पडद्यावरचे सर्वात महागडे कलाकार आहेत असे बोलले जाते. त्यामुळे हे कलाकार महिन्याला लाखोंची रक्कम आपल्या खात्यात जमा करत आहेत. यशाच्या शिखरावर असतानाही जर अजूनही पॉकेटमनी वर विसंबून राहत असेल तर त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे अगदी खरं आहे. स्वप्नीलला दर महिन्याला त्याच्या आई वडिलांकडून एक ठराविक रक्कम खर्च करण्यासाठी मिळत असते. हा खुलासा नुकतेच त्याने मसालेदार किचन कल्लाकारच्या मंचावर केला आहे.

swapnil joshi with family
swapnil joshi with family

आजच्या भागात किचन कल्लाकार मध्ये तू तेव्हा तशी या मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्यावेळी स्वप्नीलने हा खुलासा करत म्हटले आहे की, मला माझ्या कमाईचे जे काही पैसे मिळतात ते आई वडिलांकडे जातात.आणि त्यातून दर महिन्याला मला एक रक्कम मिळते खर्च करण्यासाठी. परंतु महिन्याच्या आत जर ही रक्कम संपायला आली तर अधिकचे पैसे मागायचे असल्यास मला खर्च झालेल्या रकमेचा हिशोब द्यावा लागतो. मी सांगितलेला खर्च अवाजवी असेल किंवा त्यांना मान्य नसेल तर पुढचे पैसे मला मिळत नाहीत. त्या उरलेल्या पैशातच मला त्या महिन्याच्या खर्च भागवावा लागतो. खर्च कमी करायचा की जास्त करायचा हा उद्देश नाही. पण अट ही आहे की केलेला खर्च सांगायचा, मग पुढचे पैसे मिळणार.

swapnil joshi parents
swapnil joshi parents

जो खर्च तू आम्हाला सांगायला धजावणार नाहीस हा करतानाच समज की हा खर्च गैर आहे. स्वप्नीलच्या या खुलास्यावर मात्र उपस्थितांना आश्चर्य वाटले की हा सुपरस्टार असूनही आई वडिलांच्या निर्णयाचे आजही काटेकोरपणे पालन करताना दिसतो. याचे खरं तर कौतुक व्हायलाच पाहिजे. स्वप्नीलच्या आई वडिलांचा हा निर्णय खरं तर सगळ्यांनी आचरणात आणला पाहिजे. जेणेकरून मुलांच्या अवास्तव खर्चावर निर्बंध घालता येतील आणि आयुष्य सुखकर होईल. या खुलाशावर अभिज्ञा भावेची आश्चर्यकारक प्रतिक्रिया होती. कारण स्वप्नील जोशी इतका स्टायलिश जीवन जगत असतो. त्यामुळे त्याच्याकडे पाहून तिला असं वाटत नव्हतं की हा आई वडिलांकडून अजूनही पॉकेटमनी घेत असेल.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.