Breaking News
Home / नाटक / विजू मामांनी मोरूची मावशी भूमिकेचं सोनं केलं.. ही संधी मला दिल्याचे भाग्य समजतो
moruchi mavshi vijay chavan bharat jadhav
moruchi mavshi vijay chavan bharat jadhav

विजू मामांनी मोरूची मावशी भूमिकेचं सोनं केलं.. ही संधी मला दिल्याचे भाग्य समजतो

सहजसुंदर अभिनय आणि विनोदाचे अचूक टायमिंग ज्याला जमलं त्याला रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. याच यादीत भरत जाधव यांनी स्वतःचे नाव नोंदवलेले पाहायला मिळते. जत्रा, खबरदार, पछाडलेला यासारख्या चित्रपटातून त्यांची विनोदी भूमिका असो वा बकुळा नामदेव घोटाळे चित्रपटातला त्यांनी साकारलेला खलनायक. या सर्वच भूमिकेत ते अगदी चपखल बसलेले पाहायला मिळाले आहेत. आपल्या आयुष्याच्या या यशस्वी प्रवासात ते नेहमीच आपल्या आई वडिलांना, मित्रांना आणि सहकलाकारांना यशाचे श्रेय देऊ पाहतात. मात्र आणखी एक असे अभिनेते आहेत ज्यांचे तो मनापासून धन्यवाद मानतो, ते म्हणजे विजय चव्हाण.

moruchi mavshi vijay chavan bharat jadhav
moruchi mavshi vijay chavan bharat jadhav

विजय चव्हाण आणि भरत जाधव यांनी मुंबईचा डबेवाला, जत्रा, पछाडलेला अशा अनेक चित्रपट आणि नाटकातून एकत्रित काम केलं आहे. त्यामुळे विजय चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन भरत जाधव यांना नेहमी मिळाले आहे. विजू मामांच्या आठवणीत रमताना भरत जाधव म्हणाले होते की, मी वेळेच्या बाबतीत शिस्तबद्ध आहे ते केवळ विजू मामांमुळेच. मी स्वतःला नशीबवान समजतो की करिअरच्या योग्य वळणावर मला विजू मामांसारखी माणसं भेटली. विजू मामांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. ते एक कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून ग्रेट होतेच. पण त्यांच्याविषयी मला विशेष आत्मियता वाटण्याचं कारण म्हणजे लालबाग परळ, गिरणगावाशी जोडलेली त्यांची नाळ. आम्ही एकत्र खुप काम केलंय.

bharat jadhav kedar shinde
bharat jadhav kedar shinde

श्रीमंत दामोदर पंत नाटकात अनेक ठिकाणी पंत त्यांच्या मुलावर हात उचलतात. एवढा मोठा सिनिअर नट पण त्यांनी कधीही आढेवेढे घेतले नाहीत, की हे खूप जास्त होतंय वगैरे. उलट ते म्हणायचे दिग्दर्शकाला जे योग्य वाटतंय ते करा. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांनी गाजवलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचे ठरवले. त्यावेळी ही भूमिका भरत जाधवनेच करावी अशी त्यांची मनोमन ईच्छा होती. तूच ही भूमिका करू शकतोस असा ठाम विश्वास त्यांना होता. या भूमिकेसाठी तूच योग्य न्याय देऊ शकशील असे त्यांनी म्हटले होते. विजय चव्हाण यांची आठवण सांगताना भरत जाधव म्हणतात की, आचार्य अत्रे लिखित सुपरहिट नाटक ‘मोरूची मावशी’ चा पहिला प्रयोग १ मे १९६३ महाराष्ट्र दिनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला.

त्यावेळी त्यात मावशीची भूमिका साकारली होती बापूराव माने यांनी. काही वर्षानंतर हेच नाटक नव्या संचात करायचं ठरलं आणि मावशीच्या भूमिकेसाठी विचारणा झाली सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांना. पण त्यांनी नाव सुचवलं ते विजय चव्हाण यांचं. आणि विजू मामांनी त्या भूमिकेचं सोनं केलं. विजू मामा अक्षरशः जगले ती भूमिका. मावशी साकारावी तर ती विजू मामांनीच. त्यांच्यानंतर मावशी साकारायची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. मोरूची मावशीसाठी जेंव्हा मला विचारणा करण्यात आली तेंव्हा पहिला फोन विजू मामांना केला होता. की मी करू का, ते म्हणाले तूच कर! आजही मोरूची मावशीचा जिथे कुठे प्रयोग असेल तिथे देव्हाऱ्यात देवाच्या शेजारी विजू मामांची ही तसबीर असते.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.