Breaking News
Home / मालिका / बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री.. हा प्रसिद्ध अभिनेता बिग बॉसच्या घरात होणार दाखल
wild card entry
wild card entry

बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री.. हा प्रसिद्ध अभिनेता बिग बॉसच्या घरात होणार दाखल

बिग बॉसच्या घरातून कीर्तनकार शिवलीला पाटील हिने स्वतः शो मधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला होता. आजारी असल्याचे कारण सांगून तिने हा निर्णय घेतल्याने प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले होते. त्यापाठोपाठ आता ह्या आठवड्यात एलिमीनेशन राउंडमध्ये आणखी एक सदस्य आता बेघर होणार आहे. हा सदस्य कोण असेल हे लवकरच समजेल पण तुर्तास या बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे एका अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. या बातमीला हिंदी वृत्त वाहिन्यांनी दुजोरा दिला आहे.

wild card entry
wild card entry

वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री घेत असलेल्या या अभिनेत्याचे नाव आहे “आदिश वैद्य”. आदिश हा हिंदी आणि मराठी मालिका अभिनेता आहे. कुंकू टिकली आणि टॅट्टू या मालिकेतून तो पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला होता. अभिनय आणि फिटनेसकडे लक्ष्य देणाऱ्या आदीशने त्यानंतर रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेतून अभिनय साकारला होता. जिंदगी नॉट आउट, बॅरिस्टर बाबू, कुंकू टिकली आणि टॅट्टू, गुम है किसीं के प्यार में, नागीण या मालिका त्याने अभिनित केल्या आहेत. गुम है किसीं के प्यार में या मालिकेतून त्याने काही दिवसांपूर्वीच एक्झिट घेतली आहे. यात तो मोहित चव्हाणची भूमिका साकारत होता. मात्र मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये त्याला आमंत्रित करण्यात आल्याने त्याने ही मालिका सोडली असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेच्या निर्मात्यांना देखील त्याने तसे सांगितल्याची अधिकृत माहिती आता समोर येत आहे. स्वतः आदिशने या बतमीला दुजोरा दिला नसला तरी सोशल मीडियावर सध्या मात्र तो बिग बॉसच्या घरात दाखल होणार असल्याचीच चर्चा आहे.

adish vaidya big boss entry
adish vaidya big boss entry

आदिश वाईल्ड कार्ड एन्ट्री द्वारे बिग बॉसच्या घरात येणार असल्याने आता त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आदिश गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री रेवती लेले हिला डेट करत आहे. रेवती उत्कृष्ट नृत्यांगना असून या दोघांनी रात्रीस खेळ चाले, नागीण, जिंदगी नॉट आउट सारख्या मालिकेतून एकत्रित काम केले आहे. स्वामिनी या लोकप्रिय मराठी मालिकेत तिने रमाबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे रेवतीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. वर्तुळ,आपकी नजरों ने समझा अशा आणखी हिंदी मराठी मालिकेत तिने महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. आदिश वैद्य मराठी बिग बॉसच्या घरात कधी दाखल होणार याबद्दलची माहिती गुलदस्त्यात असली तरी त्याच्या एंट्रीने बिग बॉसच्या घरात काय काय धमाल घडून येणार हे पाहणे रंजक होणार आहे.

big boss marathi wildcard entry contenstant
big boss marathi wildcard entry contenstant

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.